मुख्यमंत्रीसाहेब विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळ द्या, मराठवाड्यातील आमदाराचं फेसबुक लाईव्ह करुन आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळ देत नाहीत अशी तक्रार करत औरंगाबादचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी फेसबुक लाईव्ह करून कृपया आम्हाला वेळ द्यावा अशी विनंती फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.

मुख्यमंत्रीसाहेब विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळ द्या, मराठवाड्यातील आमदाराचं फेसबुक लाईव्ह करुन आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Jul 29, 2021 | 11:10 AM

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळ देत नाहीत अशी तक्रार करत औरंगाबादचे भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी फेसबुक लाईव्ह करून कृपया आम्हाला वेळ द्यावा अशी विनंती फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.

सरकार स्थापनेला जवळपास 2 वर्ष, मुख्यमंत्री वेळ देत नाही!

सरकार स्थापनेपासून गेल्या दोन वर्षात विरोधी आमदारांना मुख्यमंत्र्यांनी वेळच दिला नसल्याचा प्रशांत बंब यांनी दावा केला आहे. ठाकरे सरकारच्या स्थापनेला आता जवळपास दोन वर्ष होत आहेत. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दोन वर्षाच्या काळात विरोधी पक्षांच्या आमदारांना वेळच दिला नाही, असं आमदार प्रशांत बंब म्हणाले.

फेसबुक लाईव्ह करत आमदार प्रशांत बंब यांचं मुख्यमंत्र्यांना अवाहन

मुख्यमंत्री साहेब आम्हाला वेळ द्या… गेल्या दोन वर्षात आपण आम्हाला वेळ दिलेला नाही… कोरोनासारखा संकट असो, राज्यातील विविध विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार, शेतकरी हिताच्या योजना, दुष्काळाचे प्रश्न या सर्वांवर आम्हाला बोलायचं आहे, आम्हाला आमचं मत मांडायचं आहे… कृपया आम्हाला भेटा, आमचं म्हणणं ऐकून घ्या… आम्हाल वेळ द्या, अशी आर्त हाक प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.

राज्यातल्या अनेक विभागात भ्रष्टाचार, माझ्याकडे पुरावे, खोटे निघाले तर राजीनामा देईन

राज्याच्या बांधकाम विभागात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार होत असल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. ते जर खोटे ठरली तर मी आमदार पदाचा राजीनामा देतो, वाटल्यास मी राजकारण सोडून देईन, असे आव्हान या निमित्ताने प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

आमदारांना भेटा, त्यांचं म्हणणं ऐका

राज्यात विकास काम करायची असतील, नैसर्गिक संकट कोरोना सारख्या संकटाला परतावून लावायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींना भेटून त्यांचे विचार आणि म्हणणं ऐकून घेणं गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

(BJP MLA prashant bamb Appeal To Cm Uddhav Thackeray)

हे ही वाचा :

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण, राज ठाकरेंकडून पायावर डोकं ठेवून नमस्कार

केंद्रातील मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही; संजय राऊतांचा घणाघात

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें