बाळासाहेबांचे विचार विकणारी औलाद; संजय शिरसाट यांचा कुणावर निशाणा

| Updated on: Mar 07, 2023 | 4:46 PM

बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांची औलाद तयार झाली आहे. त्यांनी हे सगळे विचार धुळीस मिळवले आहेत. हे विचार शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या पायाशी टांगले आहेत.

बाळासाहेबांचे विचार विकणारी औलाद; संजय शिरसाट यांचा कुणावर निशाणा
Follow us on

संभाजीनगर : औरंगाबाद आणि संभाजीनगर असा वाद सुरू आहे. या वादात इम्तियाज जलील यांनी एक स्टेटमेंट केलं. बाळासाहेब कोण, असा सवाल जलील यांनी विचारला होता. त्यावर बोलताना शिंदे गटाचे संजय शिरसाट म्हणाले, इम्तियाज जलील हे हैदराबादचे असल्यामुळे बाळासाहेब कोण हे कळले नसेल. बाळासाहेब ठाकरे कोण होते, असं जगात कुणालाही विचारलं असतं तरी कळलं असतं. पण, या निजामांच्या औलादीला दुसरं काही दिसत नाही. जलील यांनी बाळासाहेबांच्या बद्दल बोलता कामा नये. ते आमचे दैवत आहेत. विरोधात शब्द वापरला तर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्वाचा नारा बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. तीच री ओढत पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी निवडून आले. मोदींचं नाव सुचवणारेही बाळासाहेबच आहेत. मात्र, आमच्या काही लोकांना कळत नाही, तो भाग वेगळा.

भस्म लावून फिरणारे

आमच्याकडचे शहरातले भस्म लावून फिरणारे आहेत. त्यांनी हिमालयात जाऊन राहण्याची तयारी केली होती. जे स्वतःला शिवसेनाप्रमुखांचे वारसदार म्हणतात. त्यांच्या तोंडातून आतापर्यंत एक शब्द निघाला नाही. बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांची औलाद तयार झाली आहे. त्यांनी हे सगळे विचार धुळीस मिळवले आहेत. हे विचार शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या पायाशी टांगले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांना आयुष्यभर विरोध करणाऱ्यांसोबत काही लोकं जात आहेत. सर्वधर्मसमभावाचा हा विचार आहे. त्यामुळे कुणी टीका केली तर त्यांना काही वाटत नाही, असंही संजय शिरसाट यांनी सुनावलं.

जलीलबरोबर बिर्याणी खाणार का?

संजय शिरसाट यांचा निशाणा चंद्रकांत खैरे यांच्यावर होता. शिरसाट म्हणाले, मग तुम्ही कशासाठी स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणता. तो एक हरामखोर येतो. बाळासाहेबांबद्दल काहीतरी बोलतो. तुम्ही उत्तर देत नाही. संभाजीनगर नामांतर झाला त्याचा तुम्हाला आनंद नाही. औरंगजेबाची कबर हैदराबादला घेऊन जा म्हटलं तर तुम्ही त्याला पाठींबा देणार नाही का. मग, काय करणार. इम्तियाज जलीलबरोबर जाऊन बिर्याणी खाणार का, असा सवालही संजय शिरसाट यांनी विचारला.