AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray Aurangabad Sabha : “मुख्यमंत्र्यांवर बोलला तर थोबाड लाल करू”, चंद्रकांत खैरेंचा किरीट सोमय्यांना थेट इशारा

Uddhav Thackeray Aurangabad Sabha : मुख्यमंत्र्यांची औरंगाबादमध्ये सभा होतेय. त्याआधी शिवसेना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे.

Uddhav Thackeray Aurangabad Sabha : मुख्यमंत्र्यांवर बोलला तर थोबाड लाल करू, चंद्रकांत खैरेंचा किरीट सोमय्यांना थेट इशारा
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 08, 2022 | 8:36 PM
Share

औरंगाबाद : आज मुख्यमंत्री उद्धाव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा (Uddhav Thackeray Aurangabad Sabha) होतेय. त्याआधी शिवसेना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. “मुख्यमंत्र्यांविषयी बोलाल तर थोबाड लाल करू”, असा त्यांनी इशारा दिला आहे.

खैरेंचा सोमय्यांना इशारा

आज औरंगाबादच्या सभेत चंद्रकांत खैरे यांनी किरीट सोमय्या यांना इशारा दिला आहे. “कुणीही उठतं मुख्यमंत्र्यांबाबत बोलतं. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंबद्दल बोलतात. आम्ही सहन करणार नाही. फालतू शक्ती कपूर- किरीट सोमय्या उठसूठ मुख्यमंत्र्यांबाबत बोलतो. इथून पुढे जर शिवसेनेबाबत, मुख्यमंत्र्यांबाबत अवाक्षर काढलं तर आम्ही त्याचं थोबाड लाल केल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांबद्दल अरे-तुरे बोलतो. त्याला म्हणावं संभाजीनगरला ये… तुला दाखवतो…”, असं खैरे यांनी म्हटलंय.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊतांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणा आधी मनोगत व्यक्त केलं. “व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर सगळेच शिवसेनेचे वाघ आहेत आणि वाघाचा बाप पाच मिनिटात येत आहे. मराठवाड्यात खूप वर्षानंतर असी विराट सभा होतेय. 37 वर्षापूर्वी जेव्हा इथं शाखा स्थापन झाली तेव्हा कुणाला वाटलंही नसेल की उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहील आणि तेही मुख्यमंत्री म्हणून… काय ही गर्दी… असं वाटतं की समुद्राच्या लाटा उसळल्या आहेत. या लाटेचा तडाखा भाजपला बसला तर पाणी मागायलाही उठणार नाहीत. अशी प्रचंड लाट इथे उसळली आहे. ही लाट पाहून मी इतकंच सांगतो ही आंधी है तुफान है… कोई तोड नहीं है उद्धव ठाकरे का…”, असं राऊत म्हणाले.

“ही लाट दिल्लीच्या तख्तालाही हादरे दिल्याशिवाय राहणार नाही. हा महाराष्ट्र, हा मराठवाडा कुणाचा ही सांगणारी ही सभा आहे. काही लोक मधल्या काळात येऊन गेले. पण मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणाऱ्याची औलाद अजून जन्माला यायची आहे”, असंही राऊत म्हणालेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?