AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhananjay Munde : गोगलगायींनी हैराण झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफ निकषांच्या तिप्पट मदत द्या; धनंजय मुंडे यांची मागणी

Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात सुमारे 4 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात गोगलगायींनी उगवलेले सोयाबीन खाऊन टाकले. वारंवार शेतकरी गोगलगायी गोळा करून त्यावर मीठ टाकून त्यांना नष्ट करत मात्र, पुन्हा पेरणी केली तर तीच परिस्थिती आहे.

Dhananjay Munde :  गोगलगायींनी हैराण झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफ निकषांच्या तिप्पट मदत द्या; धनंजय मुंडे यांची मागणी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 22, 2022 | 1:38 PM
Share

मुंबई : बीड, लातूर व उस्मानाबाद यासह काही जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे गोगलगायींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले, तीन-चार वेळा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पीकही हाती लागले नाही, अशा शेतकऱ्यांना कपाशीवर पडलेल्या बोंडअळीवर ज्याप्रमाणे विशेष मदत देण्यात आली. त्याप्रमाणे गोगलगायींनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना (farmer) आर्थिक मदत देण्याची गरज आहे. झालेल्या नुकसानीची दाहकता व प्रमाण पाहता राज्यसरकारने अतिवृष्टी (rain) बाधित शेतकऱ्यांना नुकत्याच जाहीर केलेल्या एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे मदतीच्या तिप्पट मदत देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी मांडून केली. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर एका लक्ष्यवेधीवर बोलताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ही मागणी केली.

या लक्षवेधीवर राज्यसरकारच्यावतीने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं. सदर नुकसानीची माहिती राज्य शासनास पूर्णपणे प्राप्त व्हावी यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ शास्त्रज्ञ व अभ्यासक अशा 5 अधिकाऱ्यांची समिती नेमून गोगलगायींनी केलेल्या नुकसानीचा अभ्यास व पडताळणी करून अहवाल मागवला जाईल. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असं आश्वासन अब्दुल सत्तार यांनी दिलं. त्यावर धनंजय मुंडे यांनी आपला मुद्दा मांडला.

कृषी मंत्र्यांचं आश्वासन

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात सुमारे 4 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात गोगलगायींनी उगवलेले सोयाबीन खाऊन टाकले. वारंवार शेतकरी गोगलगायी गोळा करून त्यावर मीठ टाकून त्यांना नष्ट करत मात्र, पुन्हा पेरणी केली तर तीच परिस्थिती आहे. यामुळे तीन-चार पेरण्या करूनही गोगलगायींचे नियंत्रण नाही आणि पिकही हाती लागणार नाही, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची झाली असल्याने त्यांना आर्थिक मदत मिळण्याबाबत धनंजय मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याआधीही त्यांनी तीन वेळा राज्यशासनाकडे याबाबत पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी विधानसभेत हा विषय लक्षवेधीद्वारे मांडल्यानंतर कृषी मंत्र्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत, अभ्यास समिती नेमून आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते आज विधीमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार तसेच इतर मान्यवरांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानसभा गटनेते आमदार अनिल पाटील, विधानपरिषदेचे पक्ष प्रतोद शशिकांत शिंदे, आमदार दिलीप बनकर, आमदार यशवंत माने, आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम, आमदार संदिप क्षिरसागर, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विक्रम काळे, आमदार अनिकेत तटकरे तसेच विधीमंडळ पक्ष कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.