सोनंचांदी दान करणारी 85 वर्षाची आज्जी… पत्र्याचं घर, ना वीज, ना फरशी… तरीही 18 लाखाचे दागिने दान

स्वभावाला औषध नसते असं म्हणतात. ते खरंही आहे. मग कुणाचा स्वभाव वाईट असतो, चांगला असतो, संशयी असतो तर कुणाचा उदार असतो. धाराशीवच्या वाघे आजीचा स्वभाव मात्र दानशूरतेचा आहे. सढळ हाताने दान करण्यात कुणीही त्यांचा हात पकडू शकणार नाही.

सोनंचांदी दान करणारी 85 वर्षाची आज्जी... पत्र्याचं घर, ना वीज, ना फरशी... तरीही 18 लाखाचे दागिने दान
vitthal mandirImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 1:33 PM

संतोष जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, धाराशीव | 19 ऑक्टोबर 2023 : तुम्ही श्रीमंत आहात की गरीब? तुम्ही बंगल्यात राहता की झोपडीत? याचा आणि दानशूरतेचा काहीच संबंध नसतो. कधी कधी गर्भश्रीमंत लोक अत्यंतू कंजूष असल्याचं आढळून येतं. तर निर्धन लोक अत्यंत दानशूर असल्याचं दिसून येतं. याला अपवादही असतोच. कारण शेवटी दान करणं न करणं हा स्वभावाचा भाग आहे. आता हेच पाहा ना… धाराशीवमधील एक आज्जी पत्र्याच्या घरात राहते. पण तिने तिच्या जिंदगीभराच्या कमाईचं सोनंनाणं विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलं आहे. तिची ही दानशूरता पाहून विठ्ठल मंदिर प्रशासनाने तिचा सत्कारही केला. आज या आज्जीच्या दानशूरतेचीच पंचक्रोशीत चर्चा आहे.

बाई लिंबा वाघे असं या आजीचं नाव आहे. त्या 85 वर्षाच्या आहेत. संपूर्ण गाव तिला वाघे आजी म्हणूनच संबोधतं. धाराशीवच्या बेंबळी गावात त्या एकट्याच राहतात. 50 वर्षापूर्वी आजीच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. त्यांना मूलबाळ नाही. त्यामुळे एकट्याच त्या आयुष्य जगत आहेत. वाघे आजी अत्यंत साध्या घरात राहतात. जुनाट पत्र्याचं जीर्ण झालेलं घर, ना घरात फरशी, ना विजेची व्यवस्था… अशी आजीची अवस्था.

संध्याकाळ होण्याच्या आत भाकरी थापून खायच्या अन् रात्री मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात जमिनीवर अंग टाकायचं हा तिचा दिनक्रम. पण असं असलं तरी जिल्ह्यात ही आजी दानशूर म्हणून प्रसिद्ध आहे. आतापर्यंत तिने विविध मंदिरांना 50 लाखाहून अधिक दान केलं आहे. नुकतंच तिने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सोन्याचा कडदोरा आणि रुक्मिणीला गंठण दान केलं आहे. हे संपूर्ण सोनं 18 लाख रुपये किंमतीचं आहे.

शेती विकून दान

नवऱ्याच्या निधनानंतर वाघे आजीच्या वाट्याला 11 एकर शेती आली. या शेतीत त्या राबराब राबतात. शेतीतून येणाऱ्या उत्पन्नातून स्वत:चं पोट भरतात आणि बाकीच्या पैशात दागदागिना करतात. त्यातूनच त्यांनी 18 लाखांचे दागिने खरेदी केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्या पंढरपूरला गेल्या होत्या. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर तिने विठ्ठलाला सोन्याचा करदोडा आणि रुक्मिणीला सोन्याचं गंठण अर्पण केलं. करदोडा आणि गंठण हे 26 तोळ्याचं आहे. त्याची बाजारभावानुसार किंमत 18 लाख रुपये आहे. सहा एकर शेती विकून त्यांनी हे सोनं खरेदी केलं होतं.

या ठिकाणीही आजींचे दान

वाघे आजीने मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता सढळ हस्ते दान केलं. मंदिर समितीने शाल, श्रीफळ आणि विठ्ठलाचा भव्य फोटो देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बाई वाघे यांनी यापूर्वी धाराशीवच्या रुईभर येथील श्री दत्तमंदिराच्या कळसासाठी एक तोळे सोने आणि एक किलो चांदी अर्पण केली होती.

पळसवाडीतील मारुती मंदिरासाठी 7 लाख रुपयांच्या मूर्ती, शिवाजीनगर (धाराशिव) येथील खंडोबा मंदिरात 2 लाख रुपयांच्या मूर्ती, अक्कलकोटच्या मंदिराच्या अन्नछत्रात भांडी दिली. बेंबळीतील खंडोबा मंदिराचा जिर्णोद्धारही केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी पंढरपूरला दान देण्यासाठी सहा एकर शेती विकली आहे.

वीज कापली…

आपल्या घरातील वीजेची जोडणीही बाई वाघे यांनी तोडून टाकली आहे. रात्रीचा वेळ केवळ मिणमिणत्या दिव्याच्या सानिध्यात जातो. घरात पाण्यासाठी घागर, धान्य ठेवण्यासाठी जुन्या पद्धतीची खापराची भांडी, दोन तीन साड्या असेच साहित्य सोबत असते. वार्धक्य आलेले असतानाही स्वयंपाक आणि अन्य कामे त्या स्वतःच करतात, अशी माहिती त्यांचे नातेवाईक खंडेराव सोनटक्के यांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.