AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद मेट्रोचा पतंग उडे आकाशात, जमिनीवर जुंपली शिवसेना-भाजपात , काय आहे नवा श्रेयवाद?

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी तर शहरात एक नाही तर दोन दोन मेट्रो रेल्वे धावतील, अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच शेंद्रा ते वाळूज मार्गावरील मेट्रो रेल्वेसाठी डीपीआर तयार करण्याच्या हालचालीही सुरु केल्या आहेत. हे पाहताच आता शिवसेनेही यात उडी घेतली आहे.

औरंगाबाद मेट्रोचा पतंग उडे आकाशात, जमिनीवर जुंपली शिवसेना-भाजपात , काय आहे नवा श्रेयवाद?
औरंगाबादेत मेट्रो प्रकल्पाच्या श्रेयावरून राजकारण
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 7:00 AM
Share

औरंगाबादः महापालिका निवडणूक कधी होईल, अद्याप निश्चित नाही, मात्र शहरातील विकासकामांच्या प्रस्तावाचे पतंग मात्र उंचच उंच भरारी घेत आहे. नागपूर, नाशिकच्या धर्तीवर शहरात शेंद्रा ते वाळूज असा अखंड पूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. तर याच प्रस्तावित पुलाबरोबर या दोन ठिकाणांदरम्यान मेट्रो रेल्वेच्या (Metro Railway) प्रकल्पावरही चर्चा सुरु आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी तर शहरात एक नाही तर दोन दोन मेट्रो रेल्वे धावतील, अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच शेंद्रा ते वाळूज मार्गावरील मेट्रो रेल्वेसाठी डीपीआर तयार करण्याच्या हालचालीही सुरु केल्या आहेत. हे पाहताच आता शिवसेनेही यात उडी घेतली आहे.

काय आहे नेमका प्रकल्प?

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे बैठक घेतली. यावेळी शेंद्रा ते वाळूज या प्रस्तावित अखंड उड्डाणपूलाबरोबरच आणखी जागेचे भूसंपादन करून येथे मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरु करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती दिली. रेल्वे मंत्रालयासमोर हा प्रस्ताव ठेवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उड्डाणपूल आणि महामेट्रो यांच्या संयुक्त डीपीआर तयार करण्यासाठी स्मार्ट सिटीमार्फत एका समितीचेही गठन करण्यात येत आहे. या हालचाली पाहिल्यानंतर शिवसेनेने यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत खैरेनी दिला लेखी पुरावा…

Khaire letter, Aurangabad

चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत मांडलेला मेट्रोचा प्रस्ताव

माजी खासदार आणि शहरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी तर आम्हीच शहरात मेट्रोची मागणी पहिल्यांदा केल्याचा दावा केला. 7 फेब्रुवारी 2018 रोजी ही मागणी मी लोकसभेत नियम 377 काळात केली होती. त्यामुळे ही शिवसेनेची मागणी असल्याचे सिद्ध झाले आहे. जिल्ह्यात अजिंठा-वेरुळ लेणी, बीबीका मकबरा, शहरातून साईबाबा संस्थान शिर्डी, शनी शिंगणापूर इत्यादीसह प्रमुख धार्मिक स्थळांसाठी पर्यटक येतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सुरळीत व्हावी, मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर, पर्यटन केंद्र येथे जाण्या-येण्यासाठी मेट्रो रेल आवळ्यक असल्याचे मी लोकसभेत सांगितले होते. तत्कालीन रेल्वे खात्याने याबाबत सर्वेक्षण करून अर्थसंकल्पात तरतूद केली होती, असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

कराड म्हणतात चर्चा करणे म्हणजे…

मेट्रोचे श्रेय घेण्यावरून चंद्रकांत खैरेंच्या या प्रतिक्रियेला भाजप नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, लोकसभेत चप्चा करणे म्हणजे हा प्रस्तावर मंजूर झाला असे नसते. त्यासाठी तांत्रिक पाठपुरावादेखील महत्त्वाचा असतो. मेट्रोची मागणी पहिल्यांदा मागील आठवड्यात समोर आली. उड्डाणपूल आणि मेट्रो सोबतच झाल्यास कोट्यवधी रुपये वाचतील. म्हणून डीपीआरचे कामही पुढे नेण्यास दोन दिवसांपूर्वी चर्चा केली. मी लोकसभेत अनेक मुद्दे मांडले, चर्चा केली म्हणजे मीच पहिल्यांदा मांडले, असा त्याचा अर्थ होत नाही. खैरैंना या बाबी माहित नसतील तर नाईलाज आहे, असे प्रत्युत्तर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले.

इतर बातम्या-

UP Election 2022: भीम आर्मीच्या चंद्रशेखर आजाद यांनी घेतली अखिलेश यादवांची भेट, आघाडीवर चर्चा; मायावतींची डोकेदुखी वाढणार?

Video : कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवानांचं शौर्य पाहून अभिमानानं फुलेल तुमची छाती

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.