मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात रस्त्यांची दुर्दशा, मृतदेह खाटेवर टाकून नेण्याची वेळ, नागरिकांत संताप

| Updated on: Aug 28, 2021 | 5:54 PM

गावात रस्ताच नसल्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्या एका तरुणाचा मृतदेह थेट खाटेवरून नेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वाघदवाडी येथील हा प्रकार आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव तुषार मेहेर आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात रस्त्यांची दुर्दशा, मृतदेह खाटेवर टाकून नेण्याची वेळ, नागरिकांत संताप
AURANGABAD SILLOD
Follow us on

औरंगाबाद : गावात रस्ताच नसल्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्या एका तरुणाचा मृतदेह थेट खाटेवरून नेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वाघदवाडी येथील हा प्रकार आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव तुषार मेहेर आहे. विशेष म्हणजे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील हे गाव असून यामुळे राज्य सरकार आणि सत्तार यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. (due to unavailability of roads in Aurangabad Sillod villagers facing problems in cremation of dead bodies people criticizing state minister Abdul Sattar)

मृतदेह चक्क खाटेवर टाकून न्यावा लागला

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वाघदवाडी गावात तुषार मेहेर या तरुणाचा अपघातामुळे मृत्यू झाला. या गावामध्ये मागील कित्येक वर्षांपासून रस्ताच नाही. तसेच सध्या पावसाळा असल्यामुळे जी पायवाट आहे, तीसुद्धा अतिशय बिकट झाली असून या मार्गावर पाणी साचले आहे. या दयनीय परिस्थितीमुळे येथील ग्रामस्थांवर मृत तरुण तुषार मेहेर याचा मृतदेह चक्क खाटेवर टाकून न्यावा लागला. सिल्लोड शहरातील वळण रस्त्यावर या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता.

वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू

या गावात मागील कित्येक वर्षांपासून प्रवासासाठी रस्ता नाही. नागरिकांना दळणवळणाची सोय नसल्यामुळे येथील लोकांना रोजच अनेक समस्या येतात. कधी एखाद्या गंभीर रुग्णाला उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायचे असल्यास अनेक अडचणी येतात. एवढेच नाही तर कोणाचा मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह खाटावर टाकूनच न्यावा लागतो. गावाला रस्ता नसल्यामुळे कित्येक गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे.

मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात  

दरम्यान, ही घटना ज्या गावात घडली ते गाव ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात येते. एका मंत्र्याच्या मतदारसंघात अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

इतर बातम्या :

रिक्षात बसल्यावर चालकाचे बदलले हावभाव, छेडछाडीच्या भीतीने तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी

Aurangabad Weather: शहरात उन्हाचे चटके वाढले, लवकरच पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता, परतीचा पाऊस सुखावणार

छेडछाड करत भर रस्त्यात तरुणीचे कपडे फाडले, औरंगाबादमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

(due to unavailability of roads in Aurangabad Sillod villagers facing problems in cremation of dead bodies people criticizing state minister Abdul Sattar)