Aurangabad Weather: शहरात उन्हाचे चटके वाढले, लवकरच पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता, परतीचा पाऊस सुखावणार

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असल्यामुळे 30 ते 5 सप्टेंबरपर्यंत मराठवाडा (Marathwada) , विदर्भात पोषक वातावरण तयार होऊन चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Aurangabad Weather: शहरात उन्हाचे चटके वाढले,  लवकरच पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता, परतीचा पाऊस सुखावणार
20 आणि 21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोलीसह बीडलाही यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

औरंगाबाद: मागील आठवड्यापासून औरंगाबाद (Aurangabad Rain) आणि परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून उन्हाचे चटके जाणवू लागलेत. त्यामुळे नागरिकांना भर श्रावणात उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असल्यामुळे 30 ते 5 सप्टेंबरपर्यंत मराठवाडा (Marathwada) , विदर्भात पोषक वातावरण तयार होऊन चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरवासियांना सध्या जरी उकाडा जाणवत असला तरीही पावसाची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे.

(Rain forecast in next two days in Aurangabad, Marathwada and Maharashtra region)

2 दिवसात पावसाची प्रतीक्षा संपणार

ऑगस्टच्या सुरुवातीला औरंगाबाद आणि परिसरात अत्यल्प म्हणजेच 19.9 मिमी पाऊस पडला होता. त्यानंतर 16 ते 23 ऑगस्टदरम्यान सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस पडला. या काळात सुमारे 100 मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर मात्र पावसाने चांगलीच उघडीप घेतली. सकाळपासूनच उन्हं तळपू लागल्याने उकाडाही वाढला आहे. आता नागरिक परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र येत्या २ दिवसात ही प्रतीक्ष संपण्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवला जातोय. शहरात आजचे तापमान 30 अंश सेल्सियसच्या आसपास नोंदवले गेले. तर हवा कोरडी आणि आरोग्यदायी आहे.

मराठवाड्यातील 30 लघु प्रकल्प अद्याप कोरडेच

मान्सूनचे तीन महिने संपत आले असून काही भागात परभणी, नांदेड, हिंगोलीत यंदा भरपूर पाऊस पडला असला तरीही काही जिल्ह्यात पावसाने नाराजी दर्शवली. त्यामुळे मराठवाड्यातील 879 पैकी 30 लघुप्रकल्प आजही कोरडेठाक आहेत. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके तगली असली तरीही काढणीस आलेले मूग, उडीद पिकांचे वुकसान झाले.

मराठवाड्यात पावसाची असमानता

मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये 1 ते 27 ऑगस्टपर्यंत सरासरी 488.6 मिमीच्या तुलनेत 589.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.  म्हणजेच 120.6 टक्के जास्त पाऊस झाला आहे. तरीही मंडळ, गाव आणि तालुकानिहाय पावसाचे प्रमाण 50 ते 90 टक्क्यांदरम्यान कमी-जास्त आहे. तसेच कमी पाऊस झालेल्या भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

परतीचा पाऊस कसा होणार?

मराठवाड्यात मान्सूनच्या सुरुवातीला विविध भागात असमानता दिसून आली. मात्र आता परतीचा पाऊस कसा पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस सुरु होईल. मध्य व दक्षिण भारतात तो ऑक्टोबरच्या पंधरवाड्यानंतरही सुरूच राहील. उत्तर भारतात कमी पावसाचा अंदाज आहे तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र, कर्नाटकसह संपूर्ण दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे.

(Rain forecast in next two days in Aurangabad, Marathwada and Maharashtra region)

इतर बातम्याः 

Weather Alert: पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील पाच दिवसात नेमका कुठं पाऊस पडणार

Maharashtra Rain weather Update : पुढचे पाच दिवस पावसाची दडी, पुन्हा आगमन कधी?, वाचा हवामान विभागाचा रिपोर्ट

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI