AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert: पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील पाच दिवसात नेमका कुठं पाऊस पडणार?

प्रादेशिक हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

Weather Alert: पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील पाच दिवसात नेमका कुठं पाऊस पडणार?
Rain Update
| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 4:19 PM
Share

मुंबई: प्रादेशिक हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

राज्यातील आजची स्थिती कशी?

हवामान विभागानं महाराष्ट्रात आज रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सागंली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

27 ऑगस्टचा पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात उद्या प्रामुख्यानं पूर्व विदर्भाला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी देखील मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

28 ऑगस्टला राज्यात पाऊस कुठे होणार

वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात यादिवशी इतर जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.

29 आणि 30 ऑगस्टला मुसळधार

प्रादेशिक हवामान विभागानं राज्यात 29 आणि 30 ऑगस्टला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊ शकतो.

बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा

जून महिन्यात हवामान विभागानं यंदाचा मान्सून सामान्य असेल, असा अंदाज वर्तवला होता. जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यानंतर उघडीप दिली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातही बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती. पीक वाचवण्याचं आव्हान शेतकऱ्यांसमोर निर्माण झालं होतं. जुलैच्या दुसऱ्या पंधरावड्यात महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. गेल्या दहा पंधरा दिवसांपासून राज्यात पावसानं उघडीप दिली आहे. पाऊस उघडल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामं आवरली आहेत. पिकांना पावसाची आवश्यकता असून शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे. राज्यातील अनेक धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या जर पाऊस झाला नाहीतर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

इतर बातम्या:

आणीबाणीत आंदोलन, थेट मुख्यमंत्र्यांकडून भ्रष्टाचाराचे आरोप; कोण आहेत नवे सरन्यायाधीश रमण्णा?

नागपूरचे सुपुत्र जस्टीस शरद बोबडे सुप्रीम कोर्टाचे 47 वे सरन्यायाधीश

Weather Update IMD predicts heavy rainfall in Maharashtra during next four and five days

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.