AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिक्षात बसल्यावर चालकाचे बदलले हावभाव, छेडछाडीच्या भीतीने तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी

शहरातील मोंढा नाका ते आकाशवाणी चौकादरम्यान घडली घटना, घाबरलेलल्या तरुणीने रिक्षा थांबवायला सांगूनही त्याने वेग आणखी वाढवला, जीवाच्या भीतीने तरुणीने चालत्या रिक्षातून उडी मारली, गंभीर जखमी

रिक्षात बसल्यावर चालकाचे बदलले हावभाव, छेडछाडीच्या भीतीने तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी
तरुणीची धावत्या रिक्षातून उडी
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 28, 2021 | 2:27 PM
Share

औरंगाबाद: एखादी तरुणी रिक्षात बसली, रिक्षा सुरू झाल्यानंतर चालकाचे हावभाव बदलले तर काय करणार? कुणाची मदत घेणार? थांबवायला सांगितले तरीही रिक्षा अजूनही सुसाट निघाली तर? आपली छेडछाड( Harassment of women )  किंवा अपहरण होणार नाही ना.. या विचारानं थरकाप उडालेल्या तरुणीनं चक्क धावत्या रिक्षातूनच उडी मारल्याचा प्रकार नुकताच औरंगाबाद (Aurangabad crime)  इथं घडला. या प्रकारात तरुणी गंभीर जखमी झाली. (Due to fear of harassment young girl jumped off auto rickshaw in Aurangabad, Maharashtra)

औरंगाबादमध्ये आज (शनिवारी) भर दिवसा, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकार घडला. शहरातील मोंढा नाका ते आकाशवाणी चौक चौकादरम्यान ही तरुणी रिक्षात बसली. संबंधित चालकाने रिक्षा सुरू केली. पण काही अंतरावर गेल्यावर तिला चालकाच्या हावभावावर शंका आली. रिक्षात एकटीच असल्याने तरुणी प्रचंड घाबरली.

थांबवायला सांगितले तरीही वेग वाढवला

रिक्षा चालकाचे हावभाव बदलल्यावर तरुणीनं तत्काळ तो रिक्षा बाजूला घेऊन थांबवायला सांगितले. मात्र तिचे काहीही न ऐकता रिक्षा चालकानं आणखीच वेगानं रिक्षा चालवायला सुरुवात केली. अखेर छेडछाड किंवा अपहरणाच्या भीतीनं धावत्या रिक्षातून उडी मारली. या प्रकरात तरुणी गंभीर जखमी झाली.

धीट व्हा, पोलिसांना फोन करा!

शिक्षण किंवा नोकरी-कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुलींना अनेकदा छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. कोणावरही कोणताही प्रसंग ओढवू शकतो. अशा वेळी घाबरून न जाता, तरुणींनी सतर्कतेने पोलिसांना फोन करणे, हा उत्तम मार्ग असल्याचे आश्वासन दामिनी पथकाच्या प्रमुख निर्मला निंभोरे यांनी दिले. शहरात सर्व प्रमुख ठिकाणी, दूध डेअरी चौक, क्रांती चौक, आकाशवाणी चौक, गुलमंडी इत्यादी भागात पोलिसांची वाहनं फिरत असतात. त्यामुळे घटनास्थळी पोलिस अगदी दोन मिनिटात दाखल होऊ शकतात. फक्त संकटात सापडलेल्या व्यक्तींनी पोलिसांना एक फोन केला पाहिजे, अशी विनंती निर्मला निंभोरे यांनी केली.

हेल्पलाईन नंबर सेव्ह करा – 0240-2240500

शहरातील संकटातील व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक किंवा महिलांना कधीही पोलिसांची मदत लागल्यास त्यांनी तत्काळ 0240-2240500 हा क्रमांक डायल करून कंट्रोल रुमला माहिती दिली पाहिजे. कंट्रोल रुमवरून संबंधित परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना मदतीसाठी पाठवले जाते. त्यामुळे आपण फोन केल्यावर पोलिस कधी येतील आणि कधी मदत मिळेल, या विचारात न राहता, संकटातील व्यक्तींना तत्काळ फोन केला पाहिजे, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांकरिता दामिनी पथकाचे 1090, 1091 हे हेल्पलाइन नंबरही आहेत. (Due to fear of harassment young girl jumped off auto rickshaw in Aurangabad, Maharashtra)

रस्त्यावर चालताना मोबाईल घेऊन पळायचे, औरंगाबादेत दोन अट्टल चोरांना बेड्या

औरंगाबादमध्ये तिरपी बस बेदरकारपणे दामटवणाऱ्या एसटी बसचालकावर अखेर गुन्हा

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ