औरंगाबादमध्ये तिरपी बस बेदरकारपणे दामटवणाऱ्या एसटी बसचालकावर अखेर गुन्हा

सेंट्रल बॅलन्स बिघडल्यामुळे धुळे आगारातील संबंधित एसटी बस तिरपी धावत होती. तरीही एसटी न थांबवता चालकाने बस तशीच दामटवली. बसच्या धक्क्याने एक बाईक भररस्त्यात पडताना व्हिडीओमध्ये कैद झाले

औरंगाबादमध्ये तिरपी बस बेदरकारपणे दामटवणाऱ्या एसटी बसचालकावर अखेर गुन्हा
तिरप्या बसचा धक्का लागून बाईक पडली


औरंगाबाद : सेंट्रल बॅलन्स गेल्यामुळे तिरपी झालेली बस तशीच दामटवणाऱ्या एसटी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद रोडवरील घटनेचा व्हिडीओ नुकताच उजेडात आला होता. तिरपी बस बेदरकार चालवल्या प्रकरणी धुळे आगाराचे बस चालक रमेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिरप्या बसचा धक्का लागून बाईक पडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत होतं. अशाचप्रकारे काही दुचाकी चालक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. जखमी बाईकचालक साहेबसिंग कवाळे यांच्या तक्रारीवरुन रमेश पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादच्या छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

सेंट्रल बॅलन्स बिघडल्यामुळे धुळे आगारातील संबंधित एसटी बस तिरपी धावत होती. तरीही एसटी न थांबवता चालकाने बस तशीच दामटवली. बसच्या धक्क्याने एक बाईक भररस्त्यात पडताना व्हिडीओमध्ये कैद झाले आहे. तर आणखी काही बाईकस्वारही जखमी झाल्याची माहिती आहे. तिरप्या बसचा धक्का लागल्यामुळे एका तरुणाने व्हिडीओ शूट केला.

धुळे आगाराच्या तिरप्या बसमुळे औरंगाबादमधील खुलताबाद रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघातांना निमंत्रण मिळालं. तिरप्या बसमुळे दुचाकी चालकांना धक्का लागत असतानाही चालकाने बस बेदरकार तशीच चालवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | औरंगाबादमध्ये तिरप्या बसचा थरार, अनेक दुचाक्यांना धक्के, बाईकस्वार जखमी

भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, कार चक्काचूर, 3 जणांचा जागीच मृत्यू, पुणे-बंगळुरु महामार्गावर विचित्र अपघात

VIDEO | पुण्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, टिळक रोडवर झोपून गाड्या अडवण्याचा प्रयत्न

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI