VIDEO | औरंगाबादमध्ये तिरप्या बसचा थरार, अनेक दुचाक्यांना धक्के, बाईकस्वार जखमी

सेंट्रल बॅलन्स बिघडल्यामुळे धुळे आगारातील संबंधित एसटी बस तिरपी धावत होती. तरीही एसटी न थांबवता चालकाने बस तशीच दामटवली. बसच्या धक्क्याने एक बाईक भररस्त्यात पडताना व्हिडीओमध्ये कैद झाले

VIDEO | औरंगाबादमध्ये तिरप्या बसचा थरार, अनेक दुचाक्यांना धक्के, बाईकस्वार जखमी
तिरप्या बसचा धक्का लागून बाईक पडली


औरंगाबाद : सेंट्रल बॅलन्स गेल्यामुळे तिरप्या चालणाऱ्या एसटी बसचा व्हिडीओ समोर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद रोडवर हा धक्कादायक प्रकार घडला. तिरप्या बसचा धक्का लागून बाईक पडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. अशाचप्रकारे काही दुचाकी चालक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एसटी चालकाबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

सेंट्रल बॅलन्स बिघडल्यामुळे धुळे आगारातील संबंधित एसटी बस तिरपी धावत होती. तरीही एसटी न थांबवता चालकाने बस तशीच दामटवली. बसच्या धक्क्याने एक बाईक भररस्त्यात पडताना व्हिडीओमध्ये कैद झाले आहे. तर आणखी काही बाईकस्वारही जखमी झाल्याची माहिती आहे. तिरप्या बसचा धक्का लागल्यामुळे एका तरुणाने व्हिडीओ शूट केला.

धुळे आगाराच्या तिरप्या बसमुळे औरंगाबादमधील रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघातांना निमंत्रण मिळालं. तिरप्या बसमुळे दुचाकी चालकांना धक्का लागत असतानाही चालकाने बस बेदरकार तशीच चालवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, कार चक्काचूर, 3 जणांचा जागीच मृत्यू, पुणे-बंगळुरु महामार्गावर विचित्र अपघात

VIDEO | पुण्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, टिळक रोडवर झोपून गाड्या अडवण्याचा प्रयत्न

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI