AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAMU: विद्यापीठातील विद्यार्थ्यांची शुल्ककपात, जाणून घ्या सविस्तर

विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्व महाविद्यालयांनी या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत द्यावी, अशा सूचना विद्यापीठाकडून करण्यात आल्या आहेत.

BAMU: विद्यापीठातील विद्यार्थ्यांची शुल्ककपात, जाणून घ्या सविस्तर
संग्रहित छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Aug 25, 2021 | 5:54 PM
Share

औरंगाबाद: कोव्हिड-19 ची (covid-19) पार्श्वभूमी आणि पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr.BAMU university) कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी काही निकषांनुसार, शुल्क माफी आणि सवलत देण्यात आली आहे. कोरोना काळात विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील सुविधांचा वापर झाला नसल्याने विद्यार्थी व पालकांवरील भार काही प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्व महाविद्यालयांनी या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत द्यावी, अशा सूचना विद्यापीठाकडून करण्यात आल्या आहेत. (Fees deduction of various colleges under Dr BAMU university due to corona pandemic)

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे कोणत्या प्रकारचे शुल्क माफ करण्यात आले आहे, याविषयीची माहिती पुढीलप्रमाणे-

कोणते शुल्क झाले माफ?

♦ ज्या विद्यार्थ्यांचे आई/वडील/पालक कोव्हिड-19 प्रादुर्भावामुळे मयत झाले असतील अशा विद्यार्थी/ विद्यार्थिनीचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण फी माफ होईल.

♦ अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगझीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा बाबींवर कोणताही खर्च न झाल्याने त्यासाठीचे शुल्क पूर्ण माफ करण्यात आले आहे.

♦ प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयांमध्ये ई-कंटेंट घेण्यासाठी खर्च झाल्याने या शुल्कात 50% सवलत देण्यात येईल.

♦ विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतदेखील इतर इतर शुल्कांत 50% सवलत देण्यात आली आहे.

♦ विद्यार्थी वसतिगृहाचा वापर करत नसल्याने त्याचे शुल्कही पूर्ण माफ करण्यात येईल.

♦ 2020-21 या शैक्षणिक वर्षात ज्या परीक्षा झालेल्या नाहीत त्याचे परीक्षा शुल्क पुढील शैक्षणिक वर्षात समायोजित करण्यात येईल.

♦ तसेच विद्यार्थ्यांकडे प्रलंबित असलेले शुल्क 3 ते 4 हप्त्यात भरण्याची सवलत देण्यात येईल तसेच शुल्क थकीत असल्यास परीक्षेचा अर्ज अडवला जाणार नाही, अशा सूचनाही संलग्नित महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे कोव्हिड-19 च्या काळातील कौटुंबिक, आर्थिक आणि शैक्षणिक पातळ्यांवरील संकटांना तोंड देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्ककपातीमुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभाविप कार्यकर्ते-पोलिसांत राडा

मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार लढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली

(Fees deduction of various colleges under Dr BAMU university due to corona pandemic )

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?