औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या दोन गटात तुफान राडा, लाथाबुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jun 01, 2021 | 9:41 PM

रस्त्याच्या वादावरून शेतकऱ्यांच्या दोन गटात तुफान राडा झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (aurangabad fighting between two groups of farmers )

औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या दोन गटात तुफान राडा, लाथाबुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल
AURANGABAD FIGHTING
Follow us on

औरंगाबाद : रस्त्याच्या वादावरून शेतकऱ्यांच्या दोन गटात (two groups of farmers) तुफान राडा झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर आला असून यामध्ये दोन गटातील लोक एकमेकांना लाथाबुक्क्यांनी तसेच काठ्यांनी मारताना दिसत आहेत. दोन गटांतील वाद नंतर एवढा टोकाला गेला की, या प्रकाराबद्दल कन्नड पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागद गावातील डॉक्टर दिलीपसिंग राजपूत यांच्या शेतात ही हाणामारी झाली. (fighting between two groups of farmers broke out in Aurangabad Police registered case)

नेमकं प्रकरण काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील नागद गावात एक विचित्र प्रकार घडला. या गावात शेतकऱ्यांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये दोन गटातील लोक एकमेकांना चांगलेच मारहाण करत असल्याचे दिसत आहे. हे लोक लाठ्या-काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत असल्याचे दिसतेय.

लोखंडी गेटचीही तोडोफड

औरंगाबादेत कन्नडमध्ये ही घटना समोर आल्यानंतर त्याची चांगलीच चर्चा होत आहे. रस्त्याच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे. या मारहाणीमध्ये डॉक्टर दिलीपसिंग राजपूत यांच्या शेतातीतल लोखंडी गेटचीसुद्धा तोडफोड करण्यात आली.

पाहा व्हिडीओ :


दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. पोलीस याबाबत सखोल तपास करत असून यामध्ये नागद गावातील डॉक्टर दिलीपसिंग राजपूत यांच्या शेताली सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.

इतर बातम्या :

जालन्याला अ‍ॅलर्ट! ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार, जोरदार पावसाचाही इशारा

दुकानांना सील ठोकून हजारो रुपयांचा दंड, इम्तियाज जलील अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले

मोठी बातमी ! 2018 दंगल प्रकरण, शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना 6 महिन्यांची शिक्षा

(fighting between two groups of farmers broke out in Aurangabad Police registered case)