AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Gold: आज सोनं-चांदी आणखी घसरलं, काय आहेत औरंगाबादमध्ये सोन्या-चांदीचे भाव? कधी वाढणार दर?

काही दिवसांनी दसरा आणि दिवाळीदरम्यान सोन्याला पुन्हा एकदा मागणी वाढू शकते. ,सामान्य नागरिकांप्रमाणेच औद्योगिक क्षेत्रातही या काळात सोन्याची मागणी वाढते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी या काळात नागरिकांकडून विचार केला जातो.

Aurangabad Gold: आज सोनं-चांदी आणखी घसरलं, काय आहेत औरंगाबादमध्ये सोन्या-चांदीचे भाव? कधी वाढणार दर?
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Sep 16, 2021 | 5:57 PM
Share

औरंगाबाद: आंतराराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे आज पुन्हा एकदा सोन्याच्या (Gold rate) दरात घसरण झाली. चांदीनंही काहीशी घसरण अनुभवली. त्यामुळे औरंगाबाद शहरातील सोन्याच्या दरांवरही (Aurangabad city market) परिणाम झाला. औरंगाबादच्या सराफा बाजारात आज सोन्याचे दर 400 रुपयांनी घसरले तर चांदीच्या दरातही 400 रुपयांच्या आसपास घट दिसून आली. त्यामुळे सोन्या-चांदीच्या भावातील हा उतरता आलेख आणखी किती काळ राहिल, सोन्याला चांगले दिवस कधी येतील, यासंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक (Investment advise) करणे योग्य ठरेल.

शहरातील सोन्या-चांदीचे दर काय?

औरंगाबाद शहरातील सराफा बाजारात सोन्याने पुन्हा 47 हजाराची पातळी सोडली आणि भाव खाली घसरले. आज 22 कॅरेट सोन्याचे दर 46,600 रुपये प्रति तोळा असे नोंदल्या गेले. काल हे दर 47, 000 रुपये प्रति तोळा असे होते. तर चांदीनंही असाच उतरता आलेख दर्शवला. औरंगाबादमध्ये आज एक किलो शुद्ध चांदीचे दर 66,300 रुपये असल्याची माहिती, औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली. अर्थात शेअर बाजारातील घडामोडींनुसार, दरांमध्ये दर मिनिटाला चढ-उतार होत असतो. तरीही दिवसभरातील सरासरी भावांची नोंद येथे देण्यात येते.

मार्केट विक्रमावर पण सोने का घसरले?

शेअर बाजार आणि सोन्याच्या दरांचे विरोधी गणित असते. सध्या शेअर बाजाराने विक्रमी उंची गाठली आहे. बाजारात  स्थानिक वित्तीय संस्था आणि विदेशी वित्तीय संस्था या दोन्हींकडून चांगली गुंतवणूक झाल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकार सध्या राबवत असलेल्या विविध योजनांमुळे गुंतवणूकदारांमध्येही सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदार विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसा गुंतवून उत्तम परतावे मिळत आहेत. परिणामी सोन्याकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. शेअर बाजारात जेव्हा अस्थिरता असते, तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. भारताप्रमाणेच अमेरिका, जपान, सिंगापूर मार्केटमध्येही शेअर बाजार तेजीत आहे.

सोन्याला चांगले दिवस कधी येणार?

बाजारात मागणी तसा पुरवठा होत असतो. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अफगाणिस्तानमुळे असुरक्षिततेचं वातावरण आहे. सोन्याचे हब समजल्या जाणाऱ्या दुबईतही सोन्याला मागणी कमी आहे. काही दिवसांनी दसरा आणि दिवाळीदरम्यान सोन्याला पुन्हा एकदा मागणी वाढू शकते. ,सामान्य नागरिकांप्रमाणेच औद्योगिक क्षेत्रातही या काळात सोन्याची मागणी वाढते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी या काळात नागरिकांकडून विचार केला जातो. त्यामुळे दोन महिन्यांनी सोन्याचे दर वाढलेले दिसू शकतात, असा अंदाज LKP सिक्युरिटीज कंपनीचे उपाध्यक्ष विश्वनाथ बोदडे यांनी व्यक्त केला.

इतर बातम्या-

Gold Price Today : स्वस्त सोने खरेदीची संधी, रेकॉर्ड स्तरापासून अजूनही किंमत 9,358 रुपयांनी कमी, पटापट तपासा

Gold Hallmarking: केंद्र सरकार दागिन्यांच्या हॉलमार्किंगचा ‘हा’ नियम पुन्हा बदलणार?

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं.

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं

अल्पवयीन मुलाची कोयत्याने सपासप वार करुन हत्या, पोलिसांनी आरोपींची व्हॅनला बांधून भरपावसात धिंड काढली….

अल्पवयीन मुलाची कोयत्याने सपासप वार करुन हत्या, पोलिसांनी आरोपींची व्हॅनला बांधून भरपावसात धिंड काढली…

Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?.

Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं.

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?.

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?