AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगजेब..? छे छे छे छे… शी शी शी… गुणरत्न सदावर्ते यांनी असं का केलं?; प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर यांनी औरंजेबाचं दर्शन घेतल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. आंबेडकर यांच्या या कृतीवर राजकीय वर्तुळातून टीका होत असतानाच आता या वादात वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही उडी घेतली आहे.

औरंगजेब..? छे छे छे छे... शी शी शी... गुणरत्न सदावर्ते यांनी असं का केलं?; प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर काय म्हणाले?
gunratna sadavarteImage Credit source: tv9 marathi
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: | Updated on: Jun 18, 2023 | 12:02 PM
Share

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबादमध्ये औरंजेबाच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यावरून वादंग निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षांनी हा मुद्दा लावून घेत आंबेडकरांवर टीका केली आहे. तर आंबेडकरांच्या या कृतीवरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटाला घेरलं आहे. ठाकरे गटाने आता यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच ठाकरे गट औरंगजेबासमोर झुकणाऱ्या नेत्यांसोबत मांडीला मांडी लावून बसणार आहे काय? असा सवालही विरोधकांनी केला आहे. आता या वादात वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही उडी घेतली आहे. औरंजेब हा पर्याय होऊ शकत नाही. जयचंदपेक्षा महोरक्या महत्त्वाचा असतो, असा पलटावर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी मीडियाशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. आशा विचारांच्या कुणी किती निकट जावे हे ठरवले पाहिजे. औरंगजेबाचे उदात्तीकरण होत आहे, हे संविधान मानणारा माणूस मान्य करू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांचे वारसदार औरंगजेबाला थारा देऊ शकत नाही, असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.

त्या मतांचा फायदा होणार नाही

प्रकाश आंबेडकर धर्मावर राजकारण करत नाहीत, पण प्रत्येकाने स्वतःत बदल केला पाहिजे. अल्पसंख्याक समाजातील मते बाळासाहेबांना कधीही मिळत नव्हती. पण बाळासाहेबांच्या डोक्यात काय चाललंय कळत नाही. त्यांचा एमआयएमचा फॉर्म्युला फेल गेला होता. त्यामुळे आता काहीही होणार नाही. प्रकाश आंबेडकर यांना अल्पसंख्याक समाजाचा काहीही फायदा होणार नाही, असा दावा सदावर्ते यांनी केला.

शी शी शी… छे छे

जयचंद पेक्षाम्होरक्या महत्त्वाचा असतो. प्रकाश आंबेडकर वकील आहेत ते आपली थिअरी लादतात. औरंगजेब हा पर्याय होऊच शकत नाही. औरंगजेब..? छे छे छे छे छे छे छे छे छे छे छे छे… शी शी शी… छे छे, असंही ते म्हणाले.

इस बदलाव को क्या कहेंगे?

राजकारणासाठी उद्धव ठाकरे फिट नाहीत. प्रकाश आंबेडकर हे राजकारणासाठी कधीही कुणाची वकिली करत नव्हते, इस बदलाव को क्या कहेंगे? हा हा हा हा हा हा हा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Follow Us
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...