AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजा करताय पण जमिनीवर, आसनाशिवाय पूजा केल्यास काय होतं? दर्भासनचं महत्त्व घ्या जाणून

अनेक जण सकाळी आणि संध्याकाळी पूजा करतात, पण आसनाशिवाय.... पूजा करताना आसन अत्यंत महत्त्वाचं आहे. तर जाणून घ्या पूजा करताना दर्भासनाचं महत्त्व काय असतं.

पूजा करताय पण जमिनीवर, आसनाशिवाय पूजा केल्यास काय होतं? दर्भासनचं महत्त्व घ्या जाणून
| Updated on: Jul 02, 2026 | 5:18 PM
Share

हिंदू परंपरेनुसार, पूजा, जप, ध्यान आणि होम यांसारख्या आध्यात्मिक प्रथा केवळ विधीसाठीच मर्यादित नाही, तर मनावर संयम ठेवणारी पवित्र साधने आहेत. अनेक जण सकाळ संध्याकाळ पूजा करतात, पण गडबडीत आसन घ्यायला विसरतात. पण पूजा करताना दर्भासन फार महत्त्वाचं असतं, सर्वात आधी दर्भासन म्हणजे काय जाणून घ्या.. दर्भासन म्हणजे ‘दर्भ’ नावाच्या पवित्र गवतापासून किंवा कुशापासून बनवलेले आसन. सांगायचं झालं तर, अनेक लोक घरी पूजा करताना थेट जमिनीवर बसतात. परंतु शास्त्रानुसार, पूजा किंवा जप करताना थेट जमिनीवर बसण्याऐवजी आसनाचा वापर करणं अधिक योग्य मानलं जातं. आसन वापल्यामुळे आध्यात्मिक साधनेत एकाग्रता वाढते आणि पूजेचं फळ अधिक चांगले मिळतं.

आसन हे केवळ बसण्यासाठी वापरलं जाणारं साधन नाही. ते पूज करणाऱ्या व्यक्तीला स्थिरता आणि मानसिक शांती देणारं एक साधन मानलं जातं. शास्त्रानुसार, असं म्हटलं जातं की जमिनीशी थेट संपर्क न ठेवता आसनाचा वापर केल्यानं मन सहजपणे एकाग्र होतं आणि जप किंवा ध्यानादरम्यान होणारी अस्वस्थता कमी होते. म्हणूनच पूजा, व्रत, ध्यान आणि मंत्रजप यांसारख्या कार्यांमध्ये काही आसनांचा वापर करण्याची परंपरा आजही सुरू आहे.

शास्त्रानुसार, दर्भासन हे सर्व आसनांमध्ये सर्वात पवित्र आहे. दर्भाला शुद्धता आणि पवित्रतेचे प्रतीक मानलं जातं. अनेक यज्ञ, होम आणि वैदिक विधींमध्ये दर्भाला विशेष स्थान आहे. ज्योतिष परंपरेनुसार, दर्भाचा संबंध केतू ग्रहाशी जोडला जातो. त्यामुळे, विद्वानांच्या मते, दर्भासनावर बसून पूजा, ध्यान आणि नामजप केल्याने आध्यात्मिक प्रगती, एकाग्रता आणि ज्ञानवृद्धी होते. तसेच, ग्रहदोष दूर करण्यासही हे उपयुक्त ठरते, असं देखील मानलं जातं.

प्रत्येक घरात दर्भासन असेलच असं नाही. अशा परिस्थितीत, स्वच्छ पांढऱ्या कापडावर, चटईवर किंवा पूजेसाठी ठेवलेल्या विशेष चटईवर बसून पूजा करता येते. काही आचार्य असं सुचवतात की, जर दर्भासन नसेल, तर किमान एक दर्भकांडी ठेवून त्यावर स्वच्छ कापड पसरून पूजा करणं देखील शुभ मानलं जातं. सर्वात महत्वाचं म्हणजे, काही लोकांचा असा विश्वास आहे की महिलांनी दर्भासन वापरू नये, पण आध्यात्मिक विद्वान स्पष्ट करतात यावर कोणालाही बंदी नाही. महिला पूजा आणि ध्यानादरम्यान दर्भासन वापरू शकतात. पण, असा सल्ला दिला जाते की त्यांनी थेट दर्भावर बसण्याऐवजी, स्वच्छ पांढऱ्या कापडावर किंवा इतर गादीवर बसावं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प