Video | औरंगाबादेत पावसाचा हाहा:कार, पुराच्या पाण्यात चक्क विहीर वाहून गेली, थरार कॅमेऱ्यात कैद

| Updated on: Sep 08, 2021 | 8:56 PM

जिल्ह्यातील शिवना नदीला आपलेल्या पुरामुळे एका शेतकऱ्याची चक्क विहीर वाहून गेली आहे. विशेष म्हणजे विहीर वाहून जातानाचा थरार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. या घटनेमुळे औरंगाबादमध्ये झालेल्या अतीवृष्टीचा अंदाज लावण्यात येत आहे.

Video | औरंगाबादेत पावसाचा हाहा:कार, पुराच्या पाण्यात चक्क विहीर वाहून गेली, थरार कॅमेऱ्यात कैद
aurangabad rain
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी तर अतिवृष्टी झाली. पैठणसारख्या तालुक्यात शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात एक वेगळीच घटना घडली आहे. जिल्ह्यातील शिवना नदीला आलेल्या पुरामुळे एका शेतकऱ्याची विहीर चक्क वाहून गेली आहे. विशेष म्हणजे विहीर वाहून जातानाचा थरार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. या घटनेमुळे औरंगाबादमध्ये झालेल्या अतीवृष्टीचा अंदाज लावण्यात येत आहे. (heavy rain in aurangabad well swept away in gangapur taluka video went viral on social media)

पुराच्या पाण्यात थेट विहीर वाहून गेली

औरंगाबादेत पाऊस चांगलाच बरसला. जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले तसेच तलाव पूर्णपणे भरले आहेत. शिवना नदीला तर चक्क पूर आला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय. तर गंगापूर तालुक्यातील शिरसगाव इथल्या गोरखनाथ काळे या शेतकऱ्याची तर विहीरच वाहून गेली आहे. शिवना नदीला तुफान पूर आल्यामुळे हा प्रकार घडला.

पाहा व्हिडीओ :

थरार कॅमेऱ्यात कैद

शिवना नदीच्या काठावर काळे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात एक विहीर होती. मात्र, पुराच्या पाण्याने या विहिरीची नासधूस केली आहे. पूर्ण विहीरच पाण्यात वाहून गेली आहे. विशेष म्हणजे विहीर वाहून जातानाचा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विहीर वाहून गेल्यामुळे आग पाणी आणि हवा यांच्यापुढे कुणाचं काही चालत नाही हेच पुन्हा एकदा स्पष्ट झालंय असे स्थानिक नागरिक म्हणत आहेत. तसेच विहीर वाहून गेल्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

इतर बातम्या :

सहा वर्षांची मुलगी गायब, शेजारच्या तरुणाच्या घरातील कोपऱ्यात माती कशी? शहानिशासाठी खोदलं, चिमुकलीचा मृतदेह हाती, प्रचंड गदारोळ

बेळगावबाबत संजय राऊतांच्या भाजपकडे 3 अपेक्षा, आता भाजपकडून राऊतांना 5 प्रश्न!

Video | नव्या जोडीची धमाल, नवरी-नवरदेवाने केला लग्नमंडपात डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच !

(heavy rain in aurangabad well swept away in gangapur taluka video went viral on social media)