बेळगावबाबत संजय राऊतांच्या भाजपकडे 3 अपेक्षा, आता भाजपकडून राऊतांना 5 प्रश्न!

खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राऊतांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर राऊतांनी पुन्हा एकदा 3 अपेक्षा व्यक्त करत भाजपला थेट आव्हान दिलं. आता राऊतांच्या आव्हानाला उत्तर म्हणून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊतांना 5 प्रश्न विचारले आहेत.

बेळगावबाबत संजय राऊतांच्या भाजपकडे 3 अपेक्षा, आता भाजपकडून राऊतांना 5 प्रश्न!
संजय राऊत, केशव उपाध्ये

मुंबई : बेळगाव महापालिका निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप नेते आमनेसामने आले आहेत. बेळगाव महापालिकेत भाजपनं एकहाती वर्चस्व मिळवलं आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राऊतांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर राऊतांनी पुन्हा एकदा 3 अपेक्षा व्यक्त करत भाजपला थेट आव्हान दिलं. आता राऊतांच्या आव्हानाला उत्तर म्हणून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊतांना 5 प्रश्न विचारले आहेत. (Keshav Upadhyay responds to Sanjay Raut’s challenge to BJP after Belgaum election)

“उर्दूमध्ये होर्डिंग लावणारे… अजान स्पर्धा घेणारे… टीपू सुलतान जयंती साजरी करणारे… आपल्या हिंदूहृदयसम्राट दैवताला जनाब म्हणणारे… स्वतःच्या वसुलीसाठी पोलिस वापरणारे… खरंच मराठी असतात का हो? या 5 प्रश्नांची उत्तर द्या एवढी अपेक्षा मराठी जनता ठेऊ शकते ना?”, असा खोचक सवाल भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरद्वारे केलाय.

फडणवीसांचा राऊतांवर घणाघात

बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. तर बेळगावात खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झालाय, अशा शब्दात फडणवीस यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मराठी माणसाचा पराभव कुणीही करु शकत नाही. भाजपच्या नगरसेवकांमध्ये 15 पेक्षा अधिक मराठी नगरसेवक आहेत. एखाद्या पक्षाचा पराभव झाला म्हणून मराठी माणसाचा पराभव होत नाही. मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही, असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी राऊतांना दिलंय.

संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

“महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे..तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं होतं.

राऊतांचं भाजपला थेट आव्हान

त्याचबरोबर “महाराष्ट्र भाजपा कडून दोन अपेक्षा आहेत, 1)बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारका समोर डोके टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा, 2) बेळगाव पालिकेत महाराष्ट्र त विलीन होण्या बाबत दोन ओळींचा ठराव मंजूर करा.. आहे मंजूर? अहंकार बाजुला ठेवुन हे एवढे कराच!”, असं आव्हानच राऊत यांनी महाराष्ट्र भाजपला दिलं आहे.

इतर बातम्या : 

‘बेळगावात मराठी माणसाचा नाही तर संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव’, फडणवीसांचा घणाघात

Goa Election 2022 : मागच्या वेळेस गडकरी, ह्या वेळेस फडणवीस, गोव्यात ‘कमाल’ करणार? भाजपचा मास्टरप्लॅन काय?

Keshav Upadhyay responds to Sanjay Raut’s challenge to BJP after Belgaum election

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI