औरंगाबादेत नवाब मलिक यांचा पुतळा जाळला, मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भाजप नेत्यांची मागणी

औरंगाबादमधील भाजप कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करताचा मलिक यांचा पुतळा जाळला. शहरातील क्रांति चौक परिसरात हे आंदोलन सुरु असल्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव याठिकाणी गोळा झाला होता.

औरंगाबादेत नवाब मलिक यांचा पुतळा जाळला, मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भाजप नेत्यांची मागणी
औरंगाबादमध्ये भाजपच्या वतीने नवाब मलिक यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं.
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 3:57 PM

औरंगाबादः नवाब मलिक (Navab Malik) यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत राज्यभरात भाजप (Maharashtra BJP) कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरु आहेत. औरंगाबादमध्येही नवाब मलिक यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. भाजपचे शेकडो कार्यकर्ते आज क्रांती चौकात (Aurangabad Agitation) दाखल झाले. त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली.

Aurangabad BJP

नवाब मलिक यांच्याविरोधात शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली.

नवाब मलिक यांचा पुतळा जाळला

औरंगाबादमधील भाजप कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करताचा मलिक यांचा पुतळा जाळला. शहरातील क्रांति चौक परिसरात हे आंदोलन सुरु असल्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव याठिकाणी गोळा झाला होता. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

नवाब मलिकांवर देशद्रोहाचा खटला दाखल कराः प्रविण दरेकर

भाजप नेते आमि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नवाब मलिक यांचं डोकं ठिकाणावर नाही, त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार करावेत, असा सल्ला दिला आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींशी संबंध समोर आले आहेत. आता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

फडणवीस यांचेच गुन्हेगारांना संरक्षण- नवाब मलिकांचा आरोप

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांचे गुन्हेगारांना कसे संरक्षण आहे आणि राज्यात बनावट नोटांचा खेळ कसा सुरु होता याचा गौप्यस्फोट केला. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली. तेव्हा दहशतवाद संपेल, काळा पैसा बंद होईल, असे म्हटले गेले. नोटबंदीनंतर संपूर्ण देशात 2000 आणि 500 च्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. पण 8 ऑक्टोबर 2017 पर्यंत महाराष्ट्रात एकदाही बनावट नोटा पकडल्या गेल्या नाहीत. कारण फडणवीसांच्या संरक्षणात बनावट नोटांचा धंदा सुरु होता. 8 ऑक्टोबर 2027 रोजी 14 कोटी 56 लाखांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली. बनावट नोटांचं नेक्सस दाऊद, बांग्लादेश आणि पाकिस्तानपर्यंत आहे, असा दावा मलिक यांनी केला आहे.

इतर बातम्या-

औरंगाबादेत लस नसेल तर रेशन, पेट्रोल, पर्यटन, प्रवास गॅस सबकुछ बंद! सक्तीच्या सूचना, वाचा कुठे कुठे प्रमाणपत्र अनिवार्य?

उद्या सरसंघचालक औरंगाबादेत, 10 वर्षांनंतर प्रथमच मोठा दौरा, प्रचारकांच्या भेटीगाठी, आढावा बैठकांचे आयोजन

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.