AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ‘या’ शहरात भाजप आक्रमक; फोटो फाडून केला निषेध

छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात जितेंद्र आव्हाड यांचे फोटो फाडून त्यांच्याविषयीचा राग व्यक्त करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात 'या' शहरात भाजप आक्रमक; फोटो  फाडून केला निषेध
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 20, 2023 | 7:36 PM
Share

छत्रपती संभाजी नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माविषयी वक्तव्य केल्यानंतर आता भाजप आक्रमक झाला आहे. त्यामुळे भाजपकडून ठिकठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करून काही ठिकाणी त्यांचे फोटोही फाडण्यात आले आहेत. त्यामुळे भाजप आता आक्रमक होत जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सनातन धर्मावर वारंवार टीका केली जात असते. तशीच टीका त्यांनी कालही केली होती.

सनातन धर्म हा देशाला लागलेली कीड आहे या त्यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात जोरदार खळबळ उडाली आहे.त्यांच्या याच वक्तव्यावरून छत्रपती संभाजीनगरमधील भाजप युवा मोर्चाच्या कार्यर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा त्यांचे फोटो फाडून त्यांचा निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये फोटो फाढण्यात आले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला आहे. त्यामुळे त्यांच्या निषेधाच्याही घोषणा देऊन त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात जितेंद्र आव्हाड यांचे फोटो फाडून त्यांच्याविषयीचा राग व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांमध्ये आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे फोटो फाडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणा दिल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा