जलील यांचं आंदोलन प्रसिद्धीसाठी, मुख्यमंत्री मराठवाड्यासाठी विशेष घोषणा करणार : अब्दुल सत्तार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहे. मात्र त्यांचा हा दौरा वादळी ठरत आहे. कारण MIM, मनसे, मराठा क्रांती मोर्चा, भाजप या सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला आहे.

जलील यांचं आंदोलन प्रसिद्धीसाठी, मुख्यमंत्री मराठवाड्यासाठी विशेष घोषणा करणार : अब्दुल सत्तार
CM Uddhav Thackeray_Aurangabad_Imtiaz Jaleel_Chandrakant Khaire

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहे. मात्र त्यांचा हा दौरा वादळी ठरत आहे. कारण MIM, मनसे, मराठा क्रांती मोर्चा, भाजप या सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. MIM खासदार इम्तियाज जलील यांनी उपरोधात्मक स्वागत फलक लावून आंदोलन केलं. तर मराठा मोर्चाने आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनसेने विरोध दर्शवण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

MIM कडून उपहासात्मक स्वागत

एमआयएमकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उपहासात्मक स्वागत करण्यात आले. बाबा चौक परिसरात एमआयएम कार्यकर्ते एकत्र जमले. हातात स्वागताचे फलक घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. बाबा चौक परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला.  औरंगाबाद विमानतळाबाहेरून एमआयएमच्या आंदोलनकर्त्या दोन नगरसेवक आणि पदाधिकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एमआयएमकडून होणाऱ्या उपहासात्मक पद्धतीच्या स्वागतास पोलिसांची मनाई आहे.

इम्तियाज जलील

याबाबत खासदार इम्तियाज जलील म्हणाले ” आम्ही आंदोलन करतो आहोत असं कुठेही म्हटलं नाही. शिवसेनेने पुस्तक काढून किती विकास केला हे छापलं. एकाही पोस्टरवर आम्ही निषेध केला नाही. आम्ही तर फुलं घेऊन स्वागतासाठी उभे होतो. तुम्ही काही केलं नाही हे तुम्हाला माहिती आहे म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पुस्तकात सेनेच्या महापौरांनी किती काम केलं याचा गाजावाजा केलाय. मराठवाड्यासाठी एवढं काम तुम्ही केलं म्हणून तुमचं स्वागत करण्यासाठी आम्ही आलोय”

निवडणुकांच्या वेळी यायचं आणि हिंदू मुस्लिम करायचं एवढंच त्यांनी केलं. जोपर्यंत मराठवाड्याची जनता ठरवणार नाही तोपर्यंत उपयोग नाही. पोलिसांना सांगू इच्छितो, आम्ही आता आंदोलन आणखी तीव्र करणार, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल

दरम्यान शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी MIM आणि मनसेवर हल्लाबोल केला. चंद्रकांत खैरे हे पदाधिकाऱ्यांसह विमानतळावर दाखल होत त्यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. खैरे यांनी आंदोलनकर्त्या मनसेला रिकामटेकडे आणि एमआयएमला हैद्राबादी रझाकार म्हटले आहे.

अब्दुल सत्तार यांचा घणाघात

दरम्यान शिवसेना नेते आणि राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. “औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक तोंडावर म्हणून एम आय एम प्रसिद्धीसाठी विरोध करत आहे. येणाऱ्या निवडणुकीत महापालिकेत इम्तियाज जलीलांना अपेक्षित यश मिळणार नाही म्हणून हा विरोध चाललाय. मुख्यमंत्री आज मराठवाड्यासाठी विशेष घोषणा करतील” असं राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या 

LIVE : मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा, MIM, MNS आणि BJP विरोध करणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI