नांदेडमध्ये मध्यरात्री पेट्रोल ओतून बसच पेटवली, घोषणाही दिल्या; काय घडलं?

राज्यभरात मराठा आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत. मराठा आरक्षणाची मागणी मान्य न झाल्याने मराठा आंदोलक रस्त्यावर उतरला आहे. काल रात्री नांदेडमध्ये झालेल्या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नांदेडमध्ये मध्यरात्री पेट्रोल ओतून बसच पेटवली, घोषणाही दिल्या; काय घडलं?
busImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 10:14 AM

नांदेड | 13 सप्टेंबर 2023 : नांदेड-वसमत रोडवर काल रात्री एसटी बसवर अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. तब्बल 20 ते 25 तरुणांनी या बसवर हल्ला केला. आधी दगडफेक करून ही बस थांबवली. त्यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवले आणि मग पेट्रोल टाकूनही बस पेटून देण्यात आली. बस पेटवल्यानंतर हल्लेखोर पळून गेले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हे तरुण कोण आहेत? कुठून आले? याची काहीच माहिती नाहीये. तसेच या हल्ल्याची कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

परभणी जिल्ह्यातून नांदेडच्या वसमतकडे ही एसटी चालली होती. रात्री उशिरा वसमत रोडवर कासारखेडा पुलावर ही बस आल्यानंतर तिच्यावर दगडफेक करण्यात आली. 20 ते 25 तरुणांनी बसवर जोरदार दगडफेक करून बस थांबवली. या बसमधून एकूण 47 प्रवाशी प्रवास करत होते. या हल्ल्यामुळे प्रवाशीही घाबरले. बस थांबताच सर्व प्रवासी जीव वाचवत बसच्या बाहेर पडले. त्यानंतर या अज्ञात तरुणांनी बसवर पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. यावेळी त्यांनी एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा देत घटनास्थळाहून पळ काढला. बस चालकानेही त्याबाबतचा दुजोरा दिला आहे. त्यामुळे हे मराठा आंदोलक होते की अन्य कोणी लोक होते याबाबतचा तपास सुरू आहे.

नेत्यांना गावबंदी

दरम्यान, मराठा आंदोलक चांगलेच आक्रकम झाले आहेत. नांदेड जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील मेंढला आणि उमरी या दोन गावात नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तशा आशयचे फलक या दोन्ही गावात लावण्यात आले आहेत. चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण हेच आमचं लक्ष.. मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांना गावात प्रवेश नाही, असा मजकूर या फलकावर आहे.

मेंढला येथील गावकऱ्यांनी नेत्याच्या गावबंदीसह मतदानावर बहिष्कार घातल्याना देखील निर्णय घेतला आहे. उमरी गावात देखील असे फलक लावण्यात आले आहेत. दोन्ही गावातील काही तरुण जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला देखील बसले आहेत. एकूणच नांदेडमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत चालल्याचे चित्र आहे.

उपोषण सुरू

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे काल चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामुळे काल यवतमाळ-नांदेड दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हडसनी येथील दत्ता पाटील यांनी आमरण उपोषण केले होते. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते.

आता जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर पुन्हा दत्ता पाटील हडसनीकर यांनी उपोषण सुरू केले असून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दत्ता पाटील आणि जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून कोथळा येथील ग्रामस्थांनी नागपूर-तुळजापूर मार्गावर हदगाव जवळ चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.