Marathwada MLC Election Result : शिंदेंच्या नेत्याकडूनच राष्ट्रवादीचा गेम, मराठवाड्यात खेळ उलटला; महायुतीत भडका उडणार?

मराठवाडा पदवीधर MLC निवडणुकीत मोठा उलटफेर झाला असून, महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आघाडी घेतली आहे. शिंदे सेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी उघडपणे मविआचा प्रचार केल्याने अजित पवार गटाच्या उमेदवाराला मोठा फटका बसला. यामुळे महायुतीत अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

Marathwada MLC Election Result : शिंदेंच्या नेत्याकडूनच राष्ट्रवादीचा गेम, मराठवाड्यात खेळ उलटला; महायुतीत भडका उडणार?
satish chavan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2026 | 10:11 AM

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मोठा उलटफेर होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीत महायुतीचं पारडं जड असतानाही महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आघाडी घेतली आहे. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठं टेन्शन आलं आहे. शिंदे सेनेचे नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा उघड प्रचार केल्याने अजितदादा गटाच्या उमेदवाराचा गेम होताना दिसत आहे. शिंदे सेनेकडून महायुतीचा धर्म पाळला गेला नसल्याने आता शिंदे सेना आणि अजितदादा गटात जुंपण्याची शक्यता आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीचा कोटा निश्चित झाला‌ आहे. 88 हजार 558 हा कोटा ठरवण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण वैध मते 177115 इतकी ठरले आहेत. तर 16540 अवैध मते ठरली आहेत. महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना 73931 मते मिळाली आहेत. तर महायुतीचे अजितदादा गटाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना 60768 मते मिळाली आहेत. रविराज साबळे यांना 19835 मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील 13163 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे पाटील हे विजयाच्या समीप असल्याचं सांगितलं जात असून त्यामुळे अजितदादा गटाच्या गोटात नाराजी पसरली आहे.

Loading...

तरीही पराभवाच्या वाटेवर

मराठवाड्यात भाजपचे मंत्री, पालकमंत्री असूनही अजितदादा गटाला मोठा झटका बसल्याने महायुतीत खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सतीश चव्हाण हे तीन टर्मचे विधान परिषदेचे आमदार आहेत. तरीही त्यांना यावेळी मोठा फटका बसण्याची शक्यता दिसत आहे. महायुतीतील नाराजी, त्यातही शिंदे सेनेच्या नेत्याच्या नाराजीचा सतीश चव्हाण यांना मोठा फटका बसताना दिसत आहे. सतीश चव्हाण यांच्या दलबदलू भूमिकेमुळेही त्यांच्यावरची नाराजी मतेपेटीतून व्यक्त झाल्याचं सांगितलं जात आहे.

सत्तार यांचा उघड विरोध

शिंदे सेनेचे मराठवाड्यातील मोठे नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा आधीपासूनच सतीश चव्हाण यांना विरोध होता. चव्हाण यांना उमेदवारी मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज होते. त्यांनी ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. एवढंच नव्हे तर सत्तार यांनी थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या स्टेजवर जाऊन त्यांचा प्रचार केला होता. स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे आणि राजकीय कारणांमुळे सत्तार यांनी चव्हाण यांना विरोध केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us