औरंगाबादेत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड, शिवसेनेच्या मोर्चाविरोधात मनसेच्या प्रतिमोर्चाचे आयोजन

| Updated on: Nov 13, 2021 | 11:42 AM

औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या महागाईविरोधातील मोर्चाचा मनसेने निषेध केला आहे. मनसे आज प्रतिमोर्चा काढणार आहे. तत्पुर्वी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली.

औरंगाबादेत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड, शिवसेनेच्या मोर्चाविरोधात मनसेच्या प्रतिमोर्चाचे आयोजन
औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांची धरपकड
Follow us on

औरंगाबादः शहरात आज शिवसेना विरुद्ध मनसे (ShivSena-MNS) असा सामना रंगताना दिसणार आहे. देशातील महागाईच्या विरोधात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येत आहे. तर शिवसेनेच्या या मोर्चाच्या विरोधात मनसेचा प्रतिमोर्चा काढण्यात येत आहे. मात्र तत्पुर्वी शांततेच्या कारणास्तव औरंगाबादच्या पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे.

शिवसेनेचा महागाईविरोधात मोर्चा

शिवसेना नेते अंबादास दानवे काल यांनी या मोर्चाविषयी काल माहिती दिली. ते म्हणाले, केवळ इंधन दरवाढीवर अवलंबून वस्तूंच्याच दरात वाढ झाली नाही तर मोबाइल फोनचे रिचार्ज, एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेतही अधिक पैशांची कपात होत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सर्वच महाग आहे. अशा स्थितीत सामान्यांनी जगायचे कसे? या स्थितीचा निषेध करण्यासाठी शिवसेना औरंगाबादमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.

मनसेचा प्रतिमोर्चा

शिवसेनेच्या या भूमिकेवर मनसेने आक्षेप घेतला आहे. मनसेचे सुहास दाशरथे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. महागाईविरोधात मोर्चाचे सोंग करण्यापेक्षा राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी कधी देणार? हे सांगावे. शिवसेनेने या प्रश्नांची उत्तरे द्यावी, मगच त्यांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, अशी भूमिका मनसेने मांडली.

इतर बातम्या-

रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू, त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

भीषण अपघात, सळई घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला इंडिका धडकली, औरंगाबादमधील फुलंब्रीत अपघात, एक ठार