Corona Update: औरंगाबाद शहरात कोरोनाचे 11 नवे रुग्ण तर ग्रामीण भागात आणखी 19 रुग्णांची भर, दोन रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात आज महापालिकेच्या हद्दीत 08 जणांना तर ग्रामीण भागात 08 जणांना सुटी देण्यात आली. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 01 लक्ष 44 हजार 479 कोरोनामुक्त झाले असून सध्या 233 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Corona Update: औरंगाबाद शहरात कोरोनाचे 11 नवे रुग्ण तर ग्रामीण भागात आणखी 19 रुग्णांची भर, दोन रुग्णांचा मृत्यू
प्रातिनिधिक फोटो

औरंगाबाद: शहरात आज महापालिकेच्या क्षेत्रात कोरोनाचे नवे 11 रुग्ण आढळून आले तर ग्रामीण भागात आणखी 19 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत आढळून आले. महानगरपालिकेच्या हद्दीत उस्मानपुऱ्यात 1, एन-9 येथे 4, घाटी परिसर 2, एन-11 येथे 1, अन्य ठिकाणी 3 जण कोरोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह (corona test positive in Aurangabad city) आढळून आले. तर ग्रामीण भागात औरंगाबाद 3, गंगापूर 4, वैजापूर 11, पैठण 1 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला. अशा प्रकारे ग्रामीण आणि शहरी भागातील आजच्या नव्या रुग्णांची संख्या 30 च्या घरात गेली आहे व आतापर्यंतच्या जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 258 झाली आहे.

16 जणांना सुटी, दोघांचा मृत्यू

जिल्ह्यात आज महापालिकेच्या हद्दीत 08 जणांना तर ग्रामीण भागात 08 जणांना सुटी देण्यात आली. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 01 लक्ष 44 हजार 479 कोरोनामुक्त झाले असून सध्या 233 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील पैठण गेट परिसरातील एका महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला तर वैजापूरमधील गोलवाडी येथील एका महिलेचा घाटीत मृत्यू झाला.

शहराच्या प्रवेशद्वारावर अँटीजन टेस्ट

औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने 20 मार्च 2021 पासून आयुक्त श्री आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून अन्य जिल्ह्यातून अथवा बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांची शहरातील प्रवेशद्वारावर अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. आज 08 सप्टेंबर 2021 रोजी शहरातील 6 प्रवेश द्वारावरती 264 जणांची कोरोना अँटीजन चाचणी करण्यात आली.यात चिकलठाणा येथे 102, हर्सूल टी पॉईंटवर 36, कांचनवाडी येथे 55, झाल्टा फाटा येथे 43, नगर नाका येथे 12, दौलताबाद टी पॉईंट येथे 16 जणांची अँटीजन कोरोना चाचणी करण्यात आली. यात कोणीही प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा व वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.

रेल्वे स्टेशन व विमानतळावर 44 प्रवाशांची चाचणी

औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने शासन निर्देशानुसार सार्वजनिक वाहतूक सेवा अंतर्गत रेल्वे स्टेशन, विमानतळ येथे प्रवाश्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे . आज रेल्वेस्टेशन येथे 30 रेल्वे प्रवाश्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली . काल करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत कोणीही प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत. तर विमानतळ येथे 44 विमान प्रवाश्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. काल करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही. (Numbers of new corona positive patients in Aurangabad, Maharashtra)

इतर बातम्या- 

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढली, कोरोनाबळींतही वाढ सुरुच

विदर्भात पुन्हा कोरोनाचा प्रकोप, नागपूरमध्येही रुग्ण वाढले, शेकडो खाटा राखीव, लॉकडाऊन अटळ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI