ऊसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाची झुंज अपुरी, डॉ. राहुल पवारचा औरंगाबादेत मृत्यू

कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करताना राहुललाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यातच त्याला म्युकरमायकोसिसच्या संसर्गाने ग्रासले. (Dr Rahul Pawar Dies )

ऊसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाची झुंज अपुरी, डॉ. राहुल पवारचा औरंगाबादेत मृत्यू
डॉ. राहुल पवार
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 8:05 AM

औरंगाबाद : कोरोना संसर्ग आणि म्युकरमायकोसिसच्या संसर्गानंतर गेल्या महिनाभरापासून आयुष्याशी झुंज देणारा डॉ. राहुल पवार याचा मृत्यू झाला. औरंगाबादमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असताना डॉ. पवारची प्राणज्योत मालवली. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे राहुलसाठी गावकरी आणि मित्रांनी चळवळ उभारुन उपचारासाठी निधी जमवला होता. ऊसतोड कामगार कुटुंबातील तरुण जिद्दीच्या जोरावर डॉक्टर झाला होता. (Parbhani sugarcane harvester’s Doctor Son Dr Rahul Pawar Dies of COVID Complications in Aurangabad MGM Hospital)

डॉ. राहुल पवार लातूर येथील खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करत होता. कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करताना राहुललाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यातच त्याला म्युकरमायकोसिसच्या संसर्गाने ग्रासले. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती.

सोशल मीडियावर मदतीसाठी आवाहन

काही दिवसांपूर्वी डॉ. राहुल पवारच्या उपचारासाठी मदत करण्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली होती. प्रकृती गंभीर झाल्यानंतर मित्रांनी पैसे जमा करुन त्याला औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारासाठी अधिक आर्थिक मदत करण्यासाठी सोशल मीडियातून दात्यांना आवाहन करण्यात आले होते. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मदतीसाठी अनेक हात पुढे आले होते. पण अखेर राहुल पवारची जीवन-मृत्यूशी झुंज संपली.

नेमकं काय घडलं?

परभणीत पाथरी तालुक्यातील आनंद नगर तांडा भागात राहणारा डॉ. राहुल विश्वनाथ पवार आपल्या आई-वडिलांना ऊस तोडण्याच्या कामात मदत करायचा. लातूरच्या एमआयटी कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करुन रुग्णसेवा करण्याचा त्याचा ध्यास होता. ‘महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स’ या युनिव्हर्सिटीची एमबीबीएस अंतिम वर्षाची परीक्षा झाली. कोरोनाची लक्षणे जाणवत असतानाही लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा राहुलने दिल्या. परीक्षा झाल्यानंतर राहुलला कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला. त्यातच म्युकरमायकोसिसचीही लागण झाली. त्यानंतर 1 मेपासून औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते.

संबंधित बातम्या :

धक्कादायक! कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर पिता पुत्रांचा काही तासाच्या अंतरानं मृत्यू

वसईतील प्रसिद्ध डॉक्टरचा ‘कोरोना’ने मृत्यू, बविआचे माजी नगरसेवक डॉ. हेमंत पाटील कालवश

(Parbhani sugarcane harvester’s Doctor Son Dr Rahul Pawar Dies of COVID Complications in Aurangabad MGM Hospital)

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.