औरंगाबादः वैजापुरातील पालखेड यात्रेतील शंकरपट उधळला, 26 जणांवर गुन्हे, 31 लाखांचा माल जप्त !

वैजापूर तालुक्यातील पालखेडमधील पारेश्वर येथे सध्या पारेश्वर महाराज यात्रा सुरु आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित कऱण्यात येतात. पोलिसांच्या उपस्थितीतही आयोजकांनी शंकरपट भरवण्याचे धाडस केले. त्यामुळे पोलिसांनीही इथे मोठी कारवाई केली.

औरंगाबादः वैजापुरातील पालखेड यात्रेतील शंकरपट उधळला, 26 जणांवर गुन्हे, 31 लाखांचा माल जप्त !
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 2:23 PM

औरंगाबादः वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील यात्रेनिमित्त बैलशर्यत  (Bull race)अर्थात शंकरपट खेळणे काहींना महागात पडले. राज्य शासनाने शंकरपटावर बंदी घातलेली आहे. असे असूनही काही उत्साही लोक शंकरपट (Shankarpat) खेळताना आढळून आले. पोलिसांनी या शर्यती जिथे सुरु होत्या, तेथे जाऊन घोडे, बैल, टांगे असा 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 26 जणांविरुद्ध वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालखेडमधील पारेश्वर यात्रेत कारवाई

वैजापूर तालुक्यातील पालखेडमधील पारेश्वर येथे सध्या पारेश्वर महाराज यात्रा सुरु आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित कऱण्यात येतात. यात्रेमुळे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या उपस्थितीतही आयोजकांनी शंकरपट भरवण्याचे धाडस केले. त्यामुळे पोलिसांनीही इथे मोठी कारवाई केली. पोलिसांनी या ठिकाणहून 18 घोडे, 18 बैल, टांगे आणि वाहन असा एकूण 31 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच 26 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

बिडकीनमध्येही बैल शैर्यतीत 12 जण ताब्यात

औरंगाबादमधील बिडकीन येथेही पोलिसांनी बैल शर्यतीवर धडक कारवाई केली. मुख्य आयोजकांसह 12 जणांना याठिकाणाहून ताब्यात घेतले. तसेच लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जांभळी तांडा येथे काही लोक बैल शर्यत भरवत असल्याची माहिती खबरींकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने रविवारी छापा मारून कारवाई केली. याठिकाणाहून बैल, टांगा, पिकअपसह 59 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

इतर बातम्या-

OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती, कोणत्या जिल्ह्यात काय परिणाम होणार?; वाचा सविस्तर

Ankita Patil | हर्षवर्धन पाटील लेकीसह ‘शिवतीर्थ’वर, अंकिता पाटलांची राज ठाकरेंशी भेट

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.