AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : संजय राऊतांना हटवा, घर जळायला तेच जबाबदार, बंडखोर आमदार संजय शिरसाट यांची आगपाखड

आमदारांची बंडखोरी झाल्यानंतर संजय राऊत आणि अतिशय तीक्ष्ण शब्दात या आमदारांवर टीका केली होती. यात प्रेतं आणि डुकरांसारख्या शब्दांचाही उल्लेख होता. त्यामुळे आता परतल्यानंतर आमदार हे संजय राऊत यांना फैलावर घेताना दिसत आहेत.

Sanjay Raut : संजय राऊतांना हटवा, घर जळायला तेच जबाबदार, बंडखोर आमदार संजय शिरसाट यांची आगपाखड
संजय राऊतांना हटवा, घर जळायला तेच जबाबदार, बंडखोर आमदार संजय शिरसाट यांची आगपाखडImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 13, 2022 | 8:01 PM
Share

औरंगाबाद : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळं ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) पडून आणि राज्यात नंव सरकार येऊन अनेक दिवस उलटले. मात्र अजूनही सर्व आमदारांच्या तोंडामध्ये एकच नाव आहे, ते म्हणजे संजय राऊतांचं (Sanjay Raut). बंडखोर आमदारांपैकी प्रत्येक आमदार हा संजय राऊत यांच्यावर सडकून टीका करत आहेत. संजय राऊत यांची मीडियातली वक्तव्य, विरोधकांच्या बाबतीतला आक्रमकपणा, टीका करण्याची पद्धत या सर्व बाबींवर बंडखोर आमदार सध्या बरसत आहेत. आमदारांची बंडखोरी झाल्यानंतर संजय राऊत आणि अतिशय तीक्ष्ण शब्दात या आमदारांवर टीका केली होती. यात प्रेतं आणि डुकरांसारख्या शब्दांचाही उल्लेख होता. त्यामुळे आता परतल्यानंतर आमदार हे संजय राऊत यांना फैलावर घेताना दिसत आहेत, संजय शिरसाट यांनीही आता राऊतांवर थेट हल्लाबोल चढवला आहे.

संजय राऊतांना हटवा

माझे राजकारणातले गुरु बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांच्यामुळे मी आमदार झालो आहे. वडिलांनंतर त्यामुळे तेच माझे गुरु आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी संजय शिरसाट यांनी दिली. तसेच राजकारणात एकनाथ शिंदे यांनी मला साथ दिली. त्यांनी मला आधार दिला. त्यामुळे तेही माझे गुरु आहेत, असेही शिरसाट म्हणाले. तसेच संजय राऊतांना तुम्ही का महत्व देता? त्यांना काही कळतं का? संजय राऊत हा आमचा विषय नाही. आमचा शाखाप्रमुख त्यांना चांगलं उत्तर देईल. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे, असे म्हणत संजय शिरसाठ यांनी राऊतांवर थेट हल्लाबोल चढवला. तसेच शिवसेनेत काय सुरू आहे, मला माहित नाही. मात्र संजय राऊत यांना हटवा. घर जाळायला हेच कारणीभूत आहेत, असेही शिरसाट म्हणाले. तसेच मिलिंद नार्वेकरांना, दिवाकर रावते यांना विचारा की राऊतांची निष्ठा किती आहे. असेही यावेळी संजय शिरसाट म्हणाले.

कॅबिनेटचा विस्तार कधी होणार?

तर कॅबिनेटचा विस्तार आणि राष्ट्रपती निवडणुकीबाबत ही त्यांनी भाष्य केलं आहे. उद्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्यासाठी 16 तारखेला आमचं ट्रेनिंग होणार आहे. मग निवडणूक होईल आणि 18 जुलै नंतर महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या कॅबिनेटचा विस्तार होईल, अशी माहिती शिरसाट यांनी दिली आहे.  हा विस्तार 100% 18 जुलै नंतर होईल, असेही शिरसाठ यांनी सांगितलेले आहे. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातली जनता ही मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहे, त्यामुळे आता लवकरच राज्याला नवं कॅबिनेट मिळणार आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.