काय सांगता? नागपूरच्या धर्तीवर औरंगाबादेत तीन मजली उड्डाणपूल, नितीन गडकरींचं वक्तव्य

औरंगाबादमध्ये आगामी काळात बाबा पेट्रोलपंप ते वाळूजपर्यंत तीन मजली उड्डाण पूल होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. काल ते लातूर येथील विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. हा पूल प्रत्यक्षात झाल्यास पुणे, नगरला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होईल.

काय सांगता? नागपूरच्या धर्तीवर औरंगाबादेत तीन मजली उड्डाणपूल, नितीन गडकरींचं वक्तव्य
नागपूरसारखा रंगाबादेत उड्डाणपूल उभारणार असल्याचे नितीन गडकरी यांचे वक्तव्य
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 6:35 PM

लातूरः औरंगाबादमध्ये नागपूरच्या धर्तीवर 20 किलोमीटर लांबीचा तीन मजली उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली आहे. भारतातील रस्ते व पूल बांधणीत अत्याधुनिक जागतिक तंत्रज्ञान वापरण्यात येत असून कमी खर्चात, कमी वेळेत दर्जेदार काम केले जाईल, अशी ग्वाहीदेखील नितीन गडकरी यांनी लातूरमध्ये बोलताना दिली. लातूर जिल्ह्यातील 19 महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमीपूजन गुरुवारी गडकरी यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पुणे, नगर प्रवासासाठी लाभदायक

गडकरी यांच्या घोषणेनुसार, औरंगाबाद ते वाळूज हा उड्डाणपूल झाल्यास पुणे, नगरकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी सोय होणार आहे. आपल्या भाषणातही त्यांनी या पुलाचे महत्त्व स्पष्ट केले. नव्या प्रकल्पामुळे औरंगाबादच्या चौकातून थेट वाळूजपर्यंत वाहनधारकांना जाणे सोयीचे होईल. परिणामी पुण्याला जाणे अधिक सोपे होईल.

कसा असेल त्रिस्तरीय उड्डाणपूल?

लातूर जिल्ह्यातील महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते. यावेळी नियोजित तीन मजली उड्डाणपुलाविषयी बोलताना बनसोडे म्हणाले, या प्रकल्पात पहिल्या मजल्यावर आठ पदरी लेन असेल तर दुसऱ्या मजल्यावर आमखी एक पूल असेल. तर तिसऱ्या मजल्यावर मेट्रो, इलेक्ट्रिकवर चालणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यरत करण्याची योजना आहे. मराठवाड्याला 20 हजार कोटींचे रस्ते मंजूर केले आहेत. रस्ते हे केवळ गावे जोडत नाहीत तर माणसांची मनेही जोडतात, असे वक्तव्य त्यांनी यावेळी बोलताना केले.

इतर बातम्या-

‘नागपुरात चमत्कार घडणार नाही, काँग्रेसच्या अपेक्षा फोल ठरणार’, देवेंद्र फडणवीसांचा दावा

भाजपने कोणत्याही परिस्थितीत सरकार पाडायचं ठरवलंय, पण त्यांना यश येणार नाही; भुजबळांचा टोला

Non Stop LIVE Update
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.