AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संदिपान भुमरेंच्या भावाची कार्यकर्त्याला मारहाण; रस्त्याची तक्रार केल्याचा राग, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

औरंगाबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या भावाने कार्यकर्त्याला मारहाण केली आहे. रस्त्याच्या कामाची तक्रार केल्याने मारहाण करण्यात आली. रणजित नरवडे असे या मारहाण झालेल्या संबंधित व्यक्तीचे नाव आहे.

संदिपान भुमरेंच्या भावाची कार्यकर्त्याला मारहाण; रस्त्याची तक्रार केल्याचा राग, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
| Edited By: | Updated on: Dec 09, 2021 | 7:23 AM
Share

औरंगाबाद : औरंगाबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या भावाने कार्यकर्त्याला मारहाण केली आहे. रस्त्याच्या कामाची तक्रार केल्याने मारहाण करण्यात आली. रणजित नरवडे असे या मारहाण झालेल्या संबंधित व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात संदिपान भुमरे यांचे भाऊ राजू  भुमरे यांच्यासह आठ जणांवर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तक्रारीनंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रणजित नरवडे यांनी रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. 2018 मध्ये रस्त्याचे काम न करताच बोगस बिल उचलल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले होते. तक्रार केल्यानंतर घाईगडबडीने कामाला सुरुवात देखील करण्यात आली. मात्र याचा राग मनात धरून, संदिपान भुमरे यांचे भाऊ राजू  भुमरे यांनी आपल्याला लाथा, बुक्क्याने मारहाण केली, अशी तक्रार नरवडे यांनी केली आहे.

नरवडे हे भुमरेंच्या मामाचा मुलगा 

विशेष म्हणजे रणजित नरवडे हे संदिपान भुमरे यांचे नातेवाईकच आहेत. नरवडे हे भुमरे यांच्या  मामाचा मुलगा आहे.  राजू  भुमरे यांनी आपल्याच मामाच्या मुलाला मारहाण केली. घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणी  पाचोड पोलीस ठाण्यात संदीपान भुमरे यांचे भाऊ राजू  भुमरे यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; 12 डिसेंबरला संकल्प जाहीर करण्याचा मनोदय

जिल्हा परिषद, नगर पंचायतींची निवडणूक प्रक्रिया सरसकट स्थगित करा, भाजपाच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी

महापौर किशोरी पेडणेकरांकडून आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल, तर आशिष शेलारांचं पोलिस आयुक्तांना पत्र

Follow Us
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!