AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tanaji Sawant Letter : एसटी विलीनीकरणाबाबत योग्य निर्णय घ्या, शिवसेनेच्या आणखी एका आमदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र

शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनीच विलनीकरणाची मागणी केल्यामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन भाजपनं शिवसेनेला टार्गेट केलेलं आहे.

Tanaji Sawant Letter : एसटी विलीनीकरणाबाबत योग्य निर्णय घ्या, शिवसेनेच्या आणखी एका आमदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र
Uddhav Thackreay_Tanaji Sawant
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jan 10, 2022 | 1:42 PM
Share

औरंगाबाद: शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनकरणाबद्दलच्या पत्राचं प्रकरण चर्चेत आहे. हे प्रकरण ताजं असताना शिवसेनेचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.  तानाजी सावंत यांनी एसटीचे शासनात विलनीकरण करण्याची मागणी केली आहे. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विलानीकरनाची मागणी

शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनीच विलनीकरणाची मागणी केल्यामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन भाजपनं शिवसेनेला टार्गेट केलेलं आहे. राज्यात परिवहन मंत्रिपद शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब हे परिवहन मंत्री आहेत. या पार्श्वभूमीवर परंडा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी हे पत्र लिहिल्यानं चर्चा होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तानाजी सावंत यांची सुरू आहे नाराजी

तानाजी सावंत यांचं पत्र

प्रति,

मा. ना. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब,

मुख्यमंत्री,

महाराष्ट्र राज्य, मुंबई- 32

!! यांसी सस्नेह जय महाराष्ट्र !!

विषय:- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करणे बाबत..

महोदय,

उपरोक्त विषयान्वये विनंती की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या करिता एस. टी. कामगार संघटनांनी राज्यभर संप सुरू केलेला असून एस.टी. कामगारांच्या बऱ्याच मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत परंतु एस. टी. कामगार संघटना राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम असून विलीनीकरणासह अन्य मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची संघटनेने मागणी केलेली आहे.

त्या अनुषंगाने एस.टी. कामगार संघटनेचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासह अन्य मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा ही नम्र विनंती.

आपला स्नेहांकीत,

(प्रा.डॉ.श्री. तानाजी सावंत)

आमदार भूम-परंडा मतदारसंघ

इतर बातम्या:

शिवसेना आमदाराचं ‘ते’ पत्र व्हायरल, नंतर आमदार म्हणतात ‘तो मी नव्हेच’! तर भाजपकडून मात्र पत्राला जनभावनेची उपमा

Goa Assembly Election 2022 : काँग्रेस, आपच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कुणाला कुठून संधी?

Shivsena MLA Tanaji Sawant wrote letter to Uddhav Thackeray demanded ST Merger in Government

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली