औरंगाबाद: शहरातील कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खासगी प्रयोगशाळांनी मनपाकडून अँटिजन आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी परवानगी मागितली होती. अशा 39 प्रयोगशाळांनी परवानगी मागितली होती. मात्र त्यातील 15 प्रयोगशाळांतर्फे एकही अँटिजन, आरटीपीसीआर टेस्ट केली नसन्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाकडून 15 प्रयोगशाळांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.