TET प्रमाणपत्रांची औरंगाबादेत पुन्हा पडताळणी, नियुक्ती झाल्यानंतरही गुरुजींना भरली धडकी, काय आहे प्रकरण?

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या 200 तर इतर व्यवस्थापनाच्या 360 शिक्षकांच्या टीईटीच्या मूळ प्रमाणपत्राची पडताळणी शिक्षण विभागाकडून सुरु असून गुरुवारी संध्याकाळपर्यंत 150 प्रमाणपत्रे सादर झाली आहेत.

TET प्रमाणपत्रांची औरंगाबादेत पुन्हा पडताळणी, नियुक्ती झाल्यानंतरही गुरुजींना भरली धडकी, काय आहे प्रकरण?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 1:37 PM

औरंगाबादः राज्य परीक्षा परिषदेने पहिले ते पाचवी आणि सहावी ते आठवी वर्गावर 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त शिक्षकांची माहिती तसेच TET च्या मूळ प्रमाणपत्र पडताळणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातूनही मागील दोन दिवसात शिक्षण विभागाकडे पडताळणीसाठी प्रमामपत्रे यायला सुरुवात झाली आहे. गैरमार्गातून पदस्थापना मिळवलेल्या गुरुजींच्या पदावरच यातून गदा येऊ शकते. त्यामुळे अनेकांना नोकरीची आणि त्यानंतर होणाऱ्या कारवाईची धास्ती लागली आहे.

का होतेय पडताळणी?

परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी लाच घेऊन टीईटी परीक्षांमधील उमेदवारांचे गुण वाढवल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे ही प्रक्रिया करण्यात येत आहे. अशा प्रकारे पात्र ठरून कुणी शिक्षक नोकरीला लागले का, याचा शोध परीक्षा परिषदेकडून घेतला जात आहे. त्यासाठी मंगळवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मीटिंगमध्ये आयुक्तांनी कागदपत्र पडताळणीच्या सूचना पाठवल्या. जिल्ह्यात पहिली ते बारावीचे एकूण 32,813 शिक्षक असून 13 फेब्रुवारी 2013 नंतर 560 शिक्षकांची नियुक्ती झाली आहे.

औरंगाबादेत प्रमाणपत्र दाखल होण्यास सुरुवात

13 फेब्रुवारी 2013 नंतर टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या 200 तर इतर व्यवस्थापनाच्या 360 शिक्षकांच्या टीईटीच्या मूळ प्रमाणपत्राची पडताळणी शिक्षण विभागाकडून सुरु असून गुरुवारी संध्याकाळपर्यंत 150 प्रमाणपत्रे सादर झाली, असे वृत्त दैनिक लोकमतमध्ये प्रकाशित झाले आहे. या प्रक्रियेत शिक्षकांचे सर्व तपशील मागवण्यात आले आहेत. तसेच TET प्रमाणपत्राची मूळ प्रतही प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मागवली आहे.

शंका आल्यास काय कारवाई?

या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची बारकाईने पडताळणी केली जाईल. काही आक्षेपार्ह आढळल्यास त्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेस दिली जाईल. त्यानंतर संबंधित शिक्षकावर कारवाई होईल. जे शिक्षक मूळ टीईटी प्रमाणपत्र सादर करणार नाहीत, त्यांचे गेल्या महिन्याचे वेतन देण्यात येणार नसल्याचेही शिक्षण विभागाने कळवले आहे.

इतर बातम्या-

HSC SSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनचं, बोर्डाची तयारी सुरु असल्याची माहिती; 17 नंबरचे अर्ज भरण्यासही मुदतवाढ

Ashes, ENG vs AUS: अरे देवा! बॉल स्टम्पला लागला, अंपायरने LBW दिला, तरीही बॅट्समन नॉट आऊट

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.