AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राठोड यांना चपलेनं मारेन… ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांची क्लिप तुफान व्हायरल

ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांच्या एका ऑडिओ क्लिपची सध्या जोरदार चर्चा आहे. या क्लिपमध्ये त्यांनी मंत्री संजय राठोड यांना "चपलेने मारण्याची" भाषा केल्याचे ऐकू येत आहे. या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पौळ यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

संजय राठोड यांना चपलेनं मारेन... ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांची क्लिप तुफान व्हायरल
अयोध्या पोळ यांची क्लिप तुफान व्हायरल Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 01, 2025 | 12:04 PM
Share

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ या सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. अयोध्या पौळ यांची एक ऑडिओ क्लिप सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली आहे. आणि त्यामागचं कारण म्हणजे या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राठोड यांना चपलेने मारण्याची भाषा करण्यात आली आहे. मंत्री राठोड यांच्या कार्यकर्त्यांशी अयोध्या पौळ या बोलत होत्यात तेव्हा त्यांनी हा उल्लेख केल्याचे समोर आले आहे.मात्र अयोध्या पोळ यांच्या या कथित ऑडिओ क्लिपची टीव्ही9 मराठी पुष्टी करत नाही.

त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे तरी काय, काय आहे प्रकरण ?

ठाकरे गटाच्या नेत्या असलेल्या अयोध्या पौळ यांची ही ऑडिओ क्लिप खूपच व्हायरल झाली असून त्या संजय राठोडांना चपलेने मारण्याची भाषा करत असल्याचे दिसत आहे. त्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत असल्यानुसार, संजय राठोड यांच्या एका कार्यकर्त्याने अयोध्या पौळ यांना कॉल करत आधी जय महाराष्ट्र म्हटलं. त्यांच्यातील संवाद खालील प्रमाणे –

कार्यकर्ता – जय महाराष्ट्र

अयोध्या पौळ – कोण बोलतंय ? बोला जरा लवकर

कार्यकर्ता – मी उमेश राठोड बोलतोय

अयोध्या पौळ – उमेश राठोड ? कुठून बोलताय तुम्ही ?

कार्यकर्ता – मी बीडमधून बोलतोय

अयोध्या पौळ – बरं, बोला…

कार्यकर्ता – ते संजय राठोडचं काय झालं ? त्या पोस्टमध्ये काय आहे.

अयोध्या पौळ – तुम्ही जे नाव घेतलंत, कुठल्या व्यक्तीचं, त्या माझ्या पोस्टमध्ये ते नाव आहे का ? पोस्टमध्ये काय लिहीलंय, ते वाचायची अक्कल आहे की नाही तुम्हाला ? अनैतिक संबंध लोकांकडे ठेवणारा, त्याचं सगळं चित्रा वाघने काढलं ना…असल्या माणसाला तपलेने बडवलं पाहिजे. संजय राठोडसारख्या माणसाला भर चौकात चपलेने मारलं पाहिजे. मी पुन्हा तिसऱ्यांदा म्हणत्ये…संजय राठोडसारख्या माणसाला… जे चित्रा वाघने आरोप केलेत, त्या आरोपनुसार, संजय राठोड सारख्या माणसाला भर चौकात चपलेने बजवलं पाहिजे..

असं त्याचं संभाषण झाल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

तुमच नाव सदावर्ते नव्हे..सदा ओरडे असलं पाहिजे, पौळ भडकल्या..

याच दरम्यान, काल गुणरत्न सदावर्ते यांच्या टीकेवर अयोध्या पोळ यांनी मीडियाशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती. गुणरत्न सदावर्ते यांचा महाराष्ट्रासाठी आणि मराठीच्या हितासाठी काय योगदान आहे ? असा सवाल पौल यांनी विचारला.

सदावर्ते हे त्यांच्या वैयक्तिक घराचा विषय असल्यासारखं ओरडत आहेत. महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या हिताचां बोला आणि मग आगपाखड करा. तुम्ही अजुलचे आहात..तुम्ही ज्या प्रकारे बोलता तसा मला सुधा बोलता येतं, मलापण गावाकडच्या लय म्हणी पाठ आहेत. तुम्ही सगळ्यांचे बाप काढत असता ना, माझ्या समोर या मग मी आहे आणि तुम्ही आाहात, असं आव्हान पौळ यांनी दिलं.

आम्हाला तुमच्या घरावर बोलायचं नाही. पण तुमच्याच लेकरांना धड ना हिंदी येता ना मराठी ना इंग्लिश बोलता येतं. सिद्धिविनायकमध्ये ड्रेस कोड निघाला त्यावेळी सदावर्तेंची मुलगी जैन यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी एक वाक्य बोलताना, त्या हिंदी, मराठी, इंग्लिश सगळंच मिक्स करून बोलत होत्या. तुमच्या घरातल्या लेकरांना अगोदर मराठी, हिंदी आणि इंग्लिश नीट शिकवा. ज्या भाषेत प्रश्न विचारला आहे त्या भाषेत उत्तर द्यायला शिकवा असा टोला त्यांनी हाणला.

मराठी बांधवांचा आणि ठाकरेंचा हा विजय आहे. तो विजय आम्ही जल्लोष करतोय, यात तुमचं पोट दुखीच कारण काय ? असा सवाल विचारत तुमच नाव सदावर्ते नव्हे सदा ओरडे असं असायला पाहिजे होतं कारण तुम्ही सतत ओरडत असता, अशी घणाघाती टीका पौळ यांनी केली.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...