औरंगजेबावर रामदेव बाबांचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाले, तो भारताचा आदर्श…
रामदेव बाबा यांनी नागपुरातील पतंजली फूड पार्कच्या उद्घाटनाच्यावेळी औरंगजेबाच्या क्रूरतेचा तीव्र निषेध व्यक्त केला. औरंगजेब भारताचा आदर्श होऊच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजच आपले आदर्श आहेत, असं रामदेव बाबा म्हणाले. तसेच, ते जगभरात वाढत्या धार्मिक दहशतीबद्दल चिंता व्यक्त केली आणि याविरुद्ध जागतिक स्तरावर कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली.

छावा सिनेमा आल्यानंतर औरंगजेबाच्या क्रूरतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अनेक राजकीय नेते आणि इतिहास संशोधकांनी औरंगजेबाच्या क्रूरतेचा पाढाच वाचला आहे. काही राजकारण्यांनी औरंगजेबाची कबरच खोदून काढण्याची मागणी केली आहे. आता यात प्रसिद्ध योग गुरू रामदेव बाबांनी उडी घेतली आहे. औरंगजेब हा आपला आदर्श होऊच शकत नाही, आपल्या माता भगिनींवर अत्याचार करणारा व्यक्ती आपला आदर्श कसा होऊ शकतो? असा सवाल रामदेव बाबांनी केला आहे.
नागपुरात पतंजलीच्या फूड पार्कच्या उद्घाटन प्रसंगी रामदेव बाबा बोलत होते. “औरंगजेब हा भारताचा आदर्श नाही. औरंगजेबाची खानदान लुटारू खानदान होती. बाबर असो की त्याचं कुटुंब असो ते भारताला लुटण्यासाठी आले होते. त्याने हजारो महिलांवर अत्याचार केला. हे लोक आपले आदर्श होऊ शकत नाही. आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत”, असं बाबा रामदेव म्हणाले.
महजहबी आतंकवाद
“कॅलिफोर्नियातील हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. यूरोप, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सनातन धर्मांवर निशाणा साधला जात आहे. मजहबी आतंकवाद पचावला जात आहे, हे दुर्देवी आहे. यासाठी सर्व देशांनी यावर उपाय शोधला पाहिजे, यासाठी भारताने पुढाकार घेतला पाहिजे”, असं बाबा रामदेव म्हणाले.
टॅरिफ टेररिझमचा पायंडा
यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावरही भाष्य केलं आहे. ट्रम्प यांनी टॅरिफ टेररिझमचा नवीन पायंडा पाडला आहे. त्यांनी लोकशाही पायदळी तुडवली आहे. ते वर्ल्ड बँकचंही ऐकत नाहीत. डॉलरची किंमत वाढवली, गरीब विकसनशील देशाच्या पैश्याची किंमत कमी करून एक प्रकाराने आर्थिक आतंकवाद डोनाल्ड ट्रम्प चालवत आहेत. ट्रम्प, पुतीन, शी जिपिंग यांचा भरवसा नाही. भारताला विकसनशील बनवलं पाहिजे. काही शक्तीशाली देश जगाला विनाशाकडे नेण्याचा काम करत आहेत. त्यासाठी भारतीयांनी एकजुटीने सशक्त राष्ट्र निर्माण करत विध्वंसक ताकदीला उत्तर दिले पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.
महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करू
यावेळी त्यांनी फूड पार्कवरही भाष्य केलं. या फूड पार्कची रोजची क्षणता 800 टन इतकी आहे. यातून नैसर्गिक पद्धतीने ज्यूस तयार करून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समृद्धी मिळणार आहे. आज संत्र्याचे उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या पद्धतीचे रोप तयार करण्यासाठी नर्सरी तयार करू. अन्य पद्धतीचे जे फळ आहे, त्यांचाही नैसर्गिक पद्धतीने ज्यूस काढण्याचं काम करू. संत्रा निर्यात करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू. विदर्भला लागून गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान लगतच्या राज्यातून संत्रा आणण्यासाठी जाऊ, असं सांगतानाच जय जवान, जय किसान, जय मिहान हे महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करू, असं त्यांनी सांगितलं.
