‘त्या’ ऐतिहासिक माणगावच्या परिषदेचा शतकोत्तर समारोप : बाबासाहेबांच्या विचारांना प्रकाश आंबेडकरांकडून पुन्हा एकदा उजाळा

| Updated on: Apr 29, 2022 | 3:10 PM

सध्या समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याची गरज असून त्यांना सेवा, संस्था, पतसंस्थेंच्या माध्यमातून मदत करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्या ऐतिहासिक माणगावच्या परिषदेचा शतकोत्तर समारोप : बाबासाहेबांच्या विचारांना प्रकाश आंबेडकरांकडून पुन्हा एकदा उजाळा
प्रकाश आंबेडकर, छ. शाहू महाराज यांच्या उपस्थितीत माणगावच्या परिषदेचा शतकोत्तर समारोप
Image Credit source: Twitter
Follow us on

कोल्हापूरः व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांच्या विचारांचा जागर करणे आवश्यक आहे. 21 मार्च 1920 रोजी कोल्हापूर संस्थानातील माणगावमध्ये पहिल्या अस्पृश्यांची परिषद (Mangaon Conference) झाली त्यावेळी छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे दोघे एकत्र आले होते. या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी अस्पृश्यांना उद्देशून त्यांनी सांगितले होते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने तुम्हाला तुमचा नेता मिळाला असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Ad. Prakash Ambedkar) यांनी केले. ते ऐतिहासिक माणगावमध्ये आज माणगाव परिषदेच्या शतकोत्तर समारोपाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.


या कार्यक्रमाला छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विक्रमसिंह तथा राजू पाटील, क्रांती सावंत, विलास कांबळे उपस्थित होते.माणगाव परिषदेने दिलेली व्यवस्था इथली आरएसएस-बीजेपी मोडू पाहते आहे. जर ही माणगाव परिषदेची व्यवस्था मोडू द्यायची नसेल तर प्रत्येकाने आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी प्रामाणिक राहिले पाहिजे पण,त्याचबरोबर त्यांचे विचार हे अंगीकृत केले पाहिजे असं मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.

दुर्बल घटकांना मदत करण्याची गरज

यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याची गरज असून त्यांना सेवा, संस्था, पतसंस्थेंच्या माध्यमातून मदत करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

तिन्ही घरातील वंशज

या कार्यक्रमप्रसंगी माजी प्राचार्य बापूसाहेब माने, अंजली आंबेडकर यांनीही बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले. शाहू महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, या परिषदेची संपूर्ण जबाबदारी पार पाडणारे आप्पासाहेब पाटील यांचे वंशज विक्रमसिंह ऊर्फ राजू पाटील या तीनही घरण्यातील वंशजांचा गौरव करण्यात आला.

ग्रंथांचे प्रकाशन

यानिमित्ताने पुस्तक प्रकाशनचाही कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. माणगाव परिषदेचे शतकोत्तर चिंतन, अप्पासाहेब पाटील व्यर्थ ना हो बलिदान, क्रांतीचे साक्षीदार या पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.