बच्चू कडू यांची सर्वात मोठी घोषणा, कर्जमाफीचं जमलं तर ठीक अन्यथा… सरकारचं टेन्शन वाढलं!

Bacchu Kadu Morcha: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू आंदोलन करत आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने बच्चू कडू यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर बच्चू कडू हे आता मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहेत. ही भेट ठरल्यानंतरही बच्चू कडू यांनी एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

बच्चू कडू यांची सर्वात मोठी घोषणा, कर्जमाफीचं जमलं तर ठीक अन्यथा... सरकारचं टेन्शन वाढलं!
bachhu kadu and CM
| Updated on: Oct 29, 2025 | 10:45 PM

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू आंदोलन करत आहेत. न्यायालयाने आंदोलनाचे स्थळ रिकामे करण्याचा आदेश दिल्यानंतर कडू यांनी जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच बच्चू कडू आम्हाला अटक करा असं म्हणत पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाले होते, मात्र रस्त्यातच सरकारच्या शिष्टमंडळाने बच्चू कडू यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर बच्चू कडू हे आता मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहेत. ही भेट ठरल्यानंतरही बच्चू कडू यांनी एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

गृह (ग्रामीण) विभागाचे पंकज भोयार, तसेच वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या शिष्टमंडळाने बच्चू कडू तसेच इतर आंदोलकांची भेट घेतली. आंदोलनस्थळी बच्चू कडू आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळात चर्चा झाली. बच्चू कडू यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे. त्यांनी केलेल्या मागण्याचा सरकार विचार करेल, असे या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. बच्चू कडू यांनी मात्र आम्ही कर्जमाफीवर ठाम असून ते आता उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यासाठी बच्चू कडू मुंबईत येणार आहेत.

यानंतर माध्यमांसोबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आम्ही याआधीच रेल रोकोची घोषणा केलेली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे. या बैठकीत सरकारने कर्जमुक्तीच्या बाबतीत सरकारने निर्णय घेतला तर आमचा रेल रोको थांबू शकतो. निर्णय चांगला घेतला नाही, त्याबाबत घोषणा केली नाही तर 31 तारखेला आमचं आंदोलन होणार आहे. तोपर्यंत येथे मैदानावर आंदोलक थांबणार आहेत. आम्ही रस्ते मोकळे करणार आहोत, मात्र आमचं आंदोलन अद्याप थांबलेलं नाही.

आंदोलन चालूच राहणार, कोणीही घरी जाऊ नका

तत्पूर्वी आंदोलकांशी बोलताना बच्चू कडू यांनी, ‘मुख्यमंत्री आणि आपल्यात चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल्वे बंद पाडू. कोणीही आंदोलन थांबवणार नाही. कोणीही घरी जाऊ नका, असे आवाहन त्यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना केले. दरम्यान, बच्चू कडू आता मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता 30 ऑक्टोबरच्या चर्चेत नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.