
बच्चू कडू यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेमध्ये आमदारांबद्दल मोठे विधान केले. त्यांनी थेट म्हटले होते की, तुम्ही स्वत: आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका. बच्चू कडूंच्या विधानावर टीका होत असतानाच त्यांनी आता पुन्हा एकदा यावर भाष्य केले. नुकताच बच्चू कडू यांनी म्हटले की, रोज जर 12 ते 13 शेतकरी आत्महत्या करत असतील आणि सरकार जागे होत नसेल तर एकाला कापायला काय हरकत आहे?शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांनी सोयाबीन विकायला लागत आहे, अजूनही एकही खरेदी केंद्र सुरू नाही,
देवा भाऊने हमीभावाच्या 20% बोनस देऊ असं सांगितलं होतं पण हमीभाव सुद्धा मिळणार नाही.
पुढे बोलताना बच्चू कडू यांनी म्हटले की, संभाजी महाराजांच्या हत्येला अप्रत्यक्षरीत्या शिर्केच जबाबदार होते असा इतिहास आहे. शेतकऱ्यांसाठी संभाजी राजे शेवटपर्यंत लढत राहिले. बच्चू कडू यांनी प्रवीण दरेकर यांच्याबद्दल बोलताना म्हटले, प्रवीण दरेकर यांना मंत्रीपद भेटले नाही म्हणून त्यांना तेवढं बोलावं लागतं. त्यांनी कोकणात जाऊन शेतकऱ्यांचे हाल पाहिली पाहिजेत.. ते पक्षाच्या गुलामीत राहणारे लोक आहेत.
लोकांनी नेत्यावरची निष्ठा ठेवणं बंद केली पाहिजे, त्यांच्यासाठी त्यांचा पक्षप्रिय आहे. सामान्य जनता प्रिय नाही, दरेकर त्यातलेच एक आहेत त्यांची पक्षावर निष्ठा आहे. नितेश राणे यांच्याबद्दल बोलताना बच्चू कडू यांनी म्हटले की, राणे इकडे हिंदुत्वावर बोलतात व तिकडे राजस्थानमध्ये जाऊन नमाज पडतात. राणे दोन्ही तबले वाजवणारा माणूस आहे. नितेश राणे यांना माहित नाही शेती कशी करावी लागते, बाप दादाची भेटलेली इस्टेट आहे, पद आहे, त्यांना शेतकऱ्याची कदर काय?
बच्चू कडू यांनी प्रज्ञा साध्वीबद्दल बोलताना म्हटले, भाजपच्या किती मुलींनी मुस्लिमांसोबत विवाह केला आहे, मग त्याबाबत मुलींचा दोषी म्हणण्यापेक्षा त्यांच्या आई-वडिलांना सुद्धा दोषी ठरवायला व्हायला पाहिजे. अशा प्रकारचे वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. हातपाय तोडण्याची भाषा करणे म्हणजे हिंदू धर्म नाही, हिंदू धर्माने शिकवलं नाही. एखादी मुलगी स्वतःच्या इच्छेने जात असेल तर प्रेमात नातं असते प्रेम आंधळं असते. संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले की, राऊत आणि एकनाथ शिंदे यांचे पक्षांतर्गत वाद आहेत.