एखाद्या आमदाराला कापूx टाका.. बच्चू कडू यांचे खळबळजनक विधान, तुमच्यापेक्षा तुमचा बैल…
Bacchu Kadu Big statement : बच्चू कडू यांनी राज्यातील आमदारांबद्दल एक अत्यंत मोठे विधान केले आहे. ज्यानंतर एकच खळबळ उडालीये. बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत त्यांनी हे विधान केले.

प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेमध्ये एक अत्यंत धक्कादायक असे विधान करून मोठी खळबळ उडवली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर हे देखील उपस्थित होते. बच्चू कडू यांनी आमदारांबद्दल हे विधान केले असून तुम्ही स्वत: आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका असे थेट म्हटले. शेतकरी आत्महत्याबद्दल बोलताना बच्च कडू यांनी हे विधान केले. बच्चू कडू यांनी म्हटले की, सरकार हे डुकरासारखा आहे, डुक्कर परवडलं पण सरकार नाही. त्यांनी थेट सरकारवर जोरदार टीका केली.
पुढे बोलताना बच्चू कडू यांनी म्हटले की, अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका… तुम्ही विचाराची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केली, त्यामुळे शेतकरी मागे राहिला. शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात. शहरातले आमदार परवडले, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. शहरातल्या आमदारांचे मस्त असतं हप्ते वसूल केले की झालं… तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा त्याला लाथ तरी मारता येते.
बाबासाहेबांनी तलवारीने सुरू झालेली लढाई लेखणीने संपविली. शरद जोशी तुमच्यासाठी अडीच लाख पगाराची नोकरी सोडून लढले. नागपूरातील आंदोलनाबद्दल देखील बोलताना बच्चू कडू दिसले आहेत. बच्चू कडू यांनी आमदारांबद्दल केलेल्या विधानानंतर आता राज्यातील राजकारण चांगलेच पेटू शकते. त्यांनी थेट आमदारांना कापण्याची भाषा केल्याने वादळ आले.
काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू हे सरकारच्या विरोधात नागपूरात आंदोलनासाठी बसते होते. सरकारच्या शिष्टमंडळाने बच्चू कडू यांची समजूत काढली आणि ते आंदोलन संपले. आता पुन्हा एकदा बच्चू कडू हे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. ऐन दिवाळीदरम्यान त्यांनी ही परिषद घेतली. पुढील काही काळात सरकारविरोधात बच्चू कडू आणि त्यांचा पक्ष मोठा लढा उभारण्याचे दाट संकेत नक्कीच आहेत. राज्यातील अनेक नेत आज बच्चू कडू यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेण्याचे संकेत आहेत.
