AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांचा संताप! ‘NEET For Sale’चे पोस्टर थेट FTII चेअरमन आर. माधवनच्या केबीनच्या दारावर

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एक फोटो आहे. हा फोटो FTIIचे चेअरमन आर. माधवन यांच्या कॅबीनच्या दरवाजावर चिटकवला आहे.

विद्यार्थ्यांचा संताप! ‘NEET For Sale’चे पोस्टर थेट FTII चेअरमन आर. माधवनच्या केबीनच्या दारावर
R MadhavanImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 22, 2026 | 3:45 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले असून विरोधी पक्षातील नेतेही उपस्थित असल्याचे दिसत आहेत. आता हे प्रकरण थेट देशातील प्रतिष्ठित फिल्म संस्था FTII पर्यंत येऊन पोहोचले आहे. विद्यार्थ्यांनी संस्थेचा चेअरमन आणि बॉलिवूड अभिनेते आर. माधवनवर निशाणा साधला आहे.

विद्यार्थ्यांनी माधवन यांच्या कथित मौनबाजीवर नाराजी व्यक्त करत त्यांच्या केबिनच्या दारावर ‘NEET For Sale’ आणि ‘गायब’ लिहिलेले मीम पोस्टर लावले आहे. कोणीतरी याचा फोटो काढून सोशल मीडिावर शेअर केला आहे. हा फोटो सध्या तुफान व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.

अभिनेत्याने मौन का बाळगले आहे?

‘३ इडियट्स’, ‘रंग दे बसंती’ आणि ‘केसरी चॅप्टर २’ सारख्या सामाजिक आणि देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केलेल्या आर. माधवन यांनी मौन बाळगल्यामुळे FTII चे विद्यार्थी प्रचंड नाराज झाले आहेत. विद्यार्थ्यांना अशा मुद्द्यावर माधवन यांची स्पष्ट प्रतिक्रिया अपेक्षित होती.

प्रकरण काय आहे?

इंस्टाग्रामवर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये FTII मधील माधवनच्या केबिनच्या दारावर ‘NEET For Sale’ असे पोस्टर चिकटवलेले दिसत आहे. या पोस्टरमध्ये प्रसिद्ध ‘गायब’ मीमचा वापर करण्यात आला होता. या फोटोने सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरु झाली आहे आणि अनेकांनी माधवनला या मुद्द्यावर प्रतिक्रिया देण्याची विनंती केली.

नेटकऱ्यांनी केले ट्रोल

व्हायरल पोस्टनंतर आर. माधवनला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आले आहे. एका युजरने लिहिले, “तुम्ही कुठे आहात माधवन @actormaddy?” दुसऱ्या एका यूजरने मजेशीर अंदाजात म्हटले की, “अब्बा ऐकत नाहीयेत का?” काहींनी आर माधवनला टोमणा मारला की, “तो अजूनही अजीत डोवालच्या भूमिकेत आहे, जासूसाची जिंदगी सोपी नसते.”

बॉलिवूड सेलिब्रिटींची प्रतिक्रिया

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘किंग’मधील अभिनेता अभय वर्माने लाईक केले आहे. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ चित्रपटातील अभिनेते सोहम मोजुमदार यांनी लिहिले, “जशी अपेक्षा होती.” आर. माधवन आणि आमिर खानने मौन बाळगले असताना, इमरान खान, जीनत अमान, अनुराग कश्यप, नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, अभय देओल आणि ओमी वैद्य यांनी CJPच्या आंदोलनाचे समर्थन केले आहे. तर शबाना आजमी, प्रकाश राज, अमोल पराशर आणि पूनम पांडे दिल्लीत पोहोचून आंदोलकांसोबत मार्चमध्ये सहभागी झाल्या.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?