AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राँग साईडने आले अन् क्षणात घात…; मनसेच्या बड्या पदाधिकाऱ्याला भरधाव कारने उडवलं; प्रकृती चिंताजनक

बदलापूर येथील सावरकर उड्डाणपुलावर झालेल्या भीषण कार अपघातात मनसेचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष राजेश शेटे गंभीर जखमी झाले असून, अपघात करून फरार झालेल्या कार चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

राँग साईडने आले अन् क्षणात घात...; मनसेच्या बड्या पदाधिकाऱ्याला भरधाव कारने उडवलं; प्रकृती चिंताजनक
Rajesh Shete
| Updated on: Jun 09, 2026 | 12:54 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढ आहेत. त्यातच बदलापूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष राजेश शेटे यांना एका भरधाव कारने जोरदार धडक दिली आहे. हा अपघात ७ जून रोजी रात्री ११.३० च्या सुमारास बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर घडला. या भीषण अपघातात राजेश शेटे हे गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मनसेचे पदाधिकारी राजेश शेटे हे ७ जून रोजी रात्री ११.३० च्या सुमारास आपल्या दुचाकीवरून बिलोली परिसरातून आदर्श स्कूलकडे जात होते. स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरून आदर्श नगरच्या दिशेने जात असताना, शेटे हे दुचाकीवरून राँग साईडने येत होते. याच दरम्यान समोरून येणाऱ्या एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की राजेश शेटे दुचाकीवरुन खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच राजेश शेटे यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळत आहे.

अपघात CCTV कॅमेऱ्यात कैद; चालक फरार

हा संपूर्ण अपघात उड्डाणपुलावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघातानंतर जखमी झालेल्या शेटे यांना मदत करण्याऐवजी कार चालक कारसह घटनास्थळावरून वेगाने फरार झाला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले आहे. फुटेजच्या आधारे संबंधित कारचा नंबर आणि चालकाची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण

या अपघाताची माहिती मिळताच मनसेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेटे यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात गर्दी केली होती. या घटनेमुळे बदलापूर आणि मुरबाड परिसरात मनसे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघात घडवून पळ काढणाऱ्या त्या अज्ञात कार चालकाचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी चालकाला लवकरच ताब्यात घेतले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार