AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Badlapur Encounter Case : सर्वोच्च न्यायालयाने बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल बदलला, वाचा काय घडलं

बदलापूरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकाला विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Badlapur Encounter Case : सर्वोच्च न्यायालयाने बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल बदलला, वाचा काय घडलं
badlapur encounter case
| Updated on: May 05, 2025 | 2:51 PM
Share

बदलापूर विद्यार्थ्याच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या कथिक एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला एसआयटी स्थापन करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बदलला आहे. या प्रकरणात आता डीजीपी यांच्या देखरेखेखाली समिती नेमण्यात येणार आहे. बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आधी सह पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले होते.

बदलापूर येथील एका शाळेतील दोन लहान विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण प्रकरणातील सफाई कामगार आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून कल्याण येथे आणताना २३ सप्टेंबर २०२४ रोजी कथित एन्काऊंटर झाले होते. या प्रकरणात अक्षय शिंदे याच्या पालकांनी नुकसान भरपाईसाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.

राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात धाव

मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित एन्काऊंटर प्रकरणात गुंतलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर ३ मे पर्यंत केस दाखल करण्याचे आदेश ७ एप्रिल रोजी दिले होते. यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सरकारने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचा हवाला देत या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे हस्तांतरित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाअतिरिक्त वेळ मागितला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. त्यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेशाचे पालन न केल्याबद्दल अवमानाच्या कारवाईचा इशारा दिला आणि एसआयटीला गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते.

राज्य सरकारने सुरुवातीला तक्रारदार नसल्याचा दावा केला, परंतु अखेर न्यायालयाने ३ मे पर्यंत अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील गुंतललेल्या पाच पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश एसटीआयटीला दिले होते.

Follow Us
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर