AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार मेला म्हणणाऱ्या नगरसेवकाची पहिली प्रतिक्रिया आली समोर, हकालपट्टी होताच म्हणाले…

Kishor Masal : बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ यांनी अजित दादांच्या निधनावर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर आता मासाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार मेला म्हणणाऱ्या नगरसेवकाची पहिली प्रतिक्रिया आली समोर, हकालपट्टी होताच म्हणाले...
Kishor Masal Reaction after expulsion from ncpImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 08, 2026 | 7:49 PM
Share

अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. आजही अनेक कार्यकर्ते शोक व्यक्त करत आहेत. मात्र बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ यांनी अजित दादांच्या निधनावर आक्षेपार्ह विधान केलं होते. सोशल मीडियावर याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओमध्ये मासाळ हे एका महिलेला, ‘रुपाली ताई मेली पाहिजे, अजित पवार मेला त्याने मला फरक पडला नाही’ असं विधान केलं होतं. त्यानंतर मासाळ यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता मासाळ यांनी भाष्य करत मोठं विधान केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

आधी मागितली होती माफी…

अजित पवार मेला तरी फरक पडला नाही असं म्हणणाऱ्या किशोर मासाळ यांची क्लीप व्हायरल झाल्यानंतर मासाळ यांनी माफीही मागितली होती. ‘चार दिवसांपूर्वी माझी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यात मी अजित पवारांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं. मी अजित पवारांचे कुटुंबिय आणि समस्त बारामतीकरांची माफी मागतो. मी जे बोललो त्याचा पश्चाताप म्हणून अजित पवारांचा अपघात झाला, त्या ठिकाणी एकदिवसाच अन्न त्याग आत्मक्लेष आंदोलन करणार आहे.’ असं मासाळ यांनी म्हटलं होतं, मात्र आता मासाळ यांनी आपले विधान बदलले आहे.

हा माझ्यावर अन्याय…

राष्ट्रवादीतून हकालपट्टी झाल्यानंतर किशोर मासाळ यांनी म्हटले की, ‘ती ऑडिओ क्लिप कुठून आली? का आली? अचानक का आली? ते मीच बोललोय का याचा शोध घ्या. हे षडयंत्र आहे का, ते तपासा. माझ्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून मी घाबरलो होतो, त्यामुळे मी मी माफी मागितली. कोणतीही शहानिशा न करता माझ्याशी संवाद न साधता हकालपट्टीची कारवाई करण्यात आली हा माझ्यावर अन्याय आहे.’

माझं राजकीय करियर संपवण्यासाठी षडयंत्र – मासाळ

पुढे बोलताना मासाळ यांनी, हे माझं राजकीय करियर संपवण्यासाठी षडयंत्र आहे. 18 वर्षांपासून मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. माझी चुक काय याबाबत मला विचारायला हवं होतं. माझं राजकारण मी संपू देणार नाही, लवकरच राजकीय दिशा ठरवणार आहे. दोन दिवसात निर्णय घेणार आहे.

काय म्हणाले मासाळ?

Follow Us
संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ
Nagpur Orange Loss | संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ; 20-25 दिवसांपासून पाऊस गायब, शेतकरी संकटात
नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान
Donald Trump | नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान; हाऊस-सिनेटवर कोणाचं वर्चस्व?
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र.
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र अघोरी प्रकाराची चर्चा
गोकुळ निवडणुका जाहीर होताच सतेज पाटलांची बॅनरबाजी, राजकीय हालचाली...
गोकुळ निवडणुका जाहीर होताच सतेज पाटलांची बॅनरबाजी, राजकीय हालचालींना वेग
भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी...
Nashik | 15 कोटींचा पैशांचा पाऊस पाडतो! भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी, बाकी...
अजित पवारांचा अपघात कौटुंबिक विषय? बड्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना...
अजित पवारांचा अपघात कौटुंबिक विषय? बड्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना सवाल
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला..
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला...
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा!
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा! नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके म्हणाले..
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके बोलता बोलता हे काय म्हणाले?