AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुंगीचे औषध देऊन पतीवर जीवघेणा हल्ला, नंतर जिवंत गाडण्याचा प्रयत्न; बारामतीत खळबळ

Baramati Crime : बारामतीत पतीला गुंगीचे औषध देऊन अर्धबेशुद्ध केल्यानंतर त्याच्यावर बॅटने हल्ला करून घरातच पुरण्याचा कथित प्रयत्न झाला आहे.

गुंगीचे औषध देऊन पतीवर जीवघेणा हल्ला, नंतर जिवंत गाडण्याचा प्रयत्न; बारामतीत खळबळ
Baramati Wife CrimeImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 07, 2026 | 4:18 PM
Share

गेल्या काही काळापासून गुन्हेगारीच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे. अशातच आता बारामती शहरातील एका धक्कादायक प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पतीला गुंगीचे औषध देऊन अर्धबेशुद्ध केल्यानंतर त्याच्यावर बॅटने हल्ला करून घरातच बांधलेल्या चौकोनी कट्ट्यात पुरण्याचा कथित प्रयत्न झाला आहे. याबाबतची तक्रार बारामती शहर पोलिसांकडे दाखल झाली आहे. या प्रकरणी पत्नीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पत्नीच्या कृत्याने बारामतीत खळबळ

बारामतीतील या घटनेप्रकरणी प्रकाश कान्होबा जगताप (वय 71, रा. ढाकाळे, ता. बारामती) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार त्यांची सून शर्मिला प्रविण जगताप (वय 38, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, जामदार रोड, बारामती) हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 109(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

पतीला जखमी करून पुरण्याचा प्रयत्न

फिर्यादीनुसार, 30 जुलैच्या रात्रीपासून 1 ऑगस्टच्या सकाळीदरम्यान हा प्रकार घडला. आरोपी महिलेने तिचे पती प्रविण प्रकाश जगताप (वय 41) यांना गुंगीचे औषध देऊन अर्धबेशुद्ध केले. त्यानंतर बॅटने मारहाण करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, हल्ल्यानंतर जखमी व बेशुद्ध अवस्थेतील प्रविण जगताप यांना घरातील हॉललगतच्या गॅलरीत बांधलेल्या चौकोनी कट्ट्यात ठेवून त्यावर फरशी बसवून पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हा कथित कट उघडकीस आल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

पोलिसांकडून सखोल तपासाला सुरूवात

तक्रारीच्या आधारे बारामती शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले करत आहेत. जखमी प्रविण जगताप यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेमागील नेमके कारण, पुरावे आणि सर्व परिस्थितीचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाअंतीच स्पष्ट होणार असून, शहरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...