
मुंबई : पालघर येथील वाढवण बंदराचा विकास केला जाणार आहे. सुमारे 76,220 कोटी रुपयांतून जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट ( JNPT ) आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या सहयोगाने वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या बंदराचा विकास करण्यात येणार आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने समुद्र किनाऱ्यापासून 6.5 किमी अंतरावर भर समुद्रात शंकोधर बेटाच्या पलिकडे भर घालून हे बंदर विकसित करण्याला पर्यावरण खात्याने मंजूरी दिली आहे. या वाढवण बंदराच्या निर्मितीसाठी कोणतीही नवीन जमीन लागणार नसून समुद्रातच भर घातली जाणार असल्याचा सरकारचा दावा आहे. परंतू या प्रकल्पामुळे येथील जैवविविधतता आणि समुद्री सहजीवन नष्ट होण्याची भीतीही पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच समुद्राच्या पातळीत वाढ होऊन पुराचे संकट येणार असल्याची भीती स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. काय आहे नेमकी वाढवण बंदर विकास योजना त्यामुळे महाराष्ट्राच्या जीडीपीत नेमकी किती वाढ होणार, किती नोकऱ्या वाढणार…..ते पाहूयात…. ...