Uddhav Thackeray : राज्यात मतदार यादीचा मुद्दा पेटला; 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, चर्चेनंतर काय संदेश दिला?
राज्यात मतदारयादीचा मुद्दा पेटला आहे. बीडमधील 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. यावेळी ठाकरेंनी त्यांना महत्वाचा संदेश दिला.

राज्यात मतदारयादीचा मुद्दा पेटला आहे. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने नवीन प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. नव्या यादीत तब्बल 2 कोटी 6 लाख 88 हजारांहून मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झालं आहेत. या आरोप-प्रत्यारोपादरम्यान बीडमधील 250 बीएलए उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या.
उद्धव ठाकरे म्हणाले, अंबादास दानवे आणि सर्व शिवसैनिकांचं कौतुक करतो. कौतुक करायला अनेक गोष्टी आहे. तुम्ही सर्व बीडमधून आला आहात. बीड विधानसभा मतदारसंघातील बीएलए आहात. सर्व बीएलए नेमले आहेत. पूर्वी शिवसेना प्रमुखांनी सुरुवात केली होती. लोकाधिकारच्या मंडळीनी पुढाकार घेतला होता. कार्यकर्ता म्हटल्यावर घराचा विचार न करता जनतेसाठी झोकून देऊन काम करतो. शहर वेगळा भाग आहे. पण ग्रामीण भागात दऱ्याखोऱ्यात वणवण फिरत असतो. कुटुंबाकडे दुर्लक्ष करून संघटनेत कुठे काही घडलं जातो. परंतु कुटुंब वाऱ्यावर जाऊ नये, यासाठी काम करण्यास सुरुवात झाली होती. मध्ये खंड पडला. तीच योजना अधिक चांगल्या पद्धतीने सुरू केली. बीडमध्ये त्यावेळी युती होती. युती म्हटल्यावर कौटुंबीक ऋणाबंध होते. त्यांच्या प्रेमाखातर बीडच्या जागा त्यांना सोडत गेलो. त्यामुळे बीडमधील अस्तित्व कमी होत गेले’.
‘आता परत एकदा बीड पुन्हा भगवा करण्याची संधी आली आहे. भविष्यात बीड भगवा झाल्याचे आजच दिसत आहे. आता तुम्ही उल्लेख केला. ती योजना आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने नोंदणीकृत झाली आहे. या नावानेच मिळेल. नावाचा दुरूपयोग करणारे अनेक आहेत. त्याचा लवकर त्याचा निकाल लागेल. आता बीएलए म्हणून जबाबदारी महत्त्वाची आहे. भाजप खालच्या पातळीवर जाऊन डावपेच करते. त्यानंतर निवडणुका जिंकते. पश्चिम बंगाल, तामिळनाडूतील मतदार गाळले. महाराष्ट्रातील 2 कोटींहून अधिक गायब आहे. तुमच्या लक्षात येतंय का? असा सवाल उपस्थित करत गंभीर आरोप केला.