AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पती सोडून भलत्यावरच जडला जीव, ‘कार्यक्रम ओके’चा कॉल अन्.. बीडमध्ये काय घडलं ?

बीडमध्ये खुनाचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केला आणि अपघाताचा बनाव रचला. हत्येनंतर 'कार्यक्रम ओके' या कोडवर्डचा वापर केला. नेकनूर पोलिसांनी तांत्रिक तपास करून पत्नी, प्रियकर आणि साथीदाराला पनवेलमधून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पती सोडून भलत्यावरच जडला जीव, ‘कार्यक्रम ओके’चा कॉल अन्..  बीडमध्ये काय घडलं ?
क्राईम न्यूज
| Updated on: Jun 09, 2026 | 9:45 AM
Share

राज्यात गुन्ह्यांच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. चोरी, दरोडा, खन, अत्याचारा अशा एक ना अनेक दुर्दैवी आणि तितक्याच धक्कादायक घटना समोर येत असून गुन्हेगारांना कायदा-सुव्यवस्थेचा काही धाक उरलाय की नाही असाप्रश्न पडू लागला आहे. त्यातच आता बीडमधून एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराच्या मदतीने एका महिलेने तिच्या पतीचा खून केला, पण तो अपघता दिसावा म्हणून मृतदेह दुचाकीखाली दाबून रस्त्याच्या कडेला टाकून दिला होता. हत्या यशस्वी झाल्यावर या क्रूर आरोपींनी एकमेकांना फोन करून ‘कार्यक्रम ओके’ असा कोडवर्डदेखील म्हटल्याचे समोर आले. याप्रकारामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. नेकनूर पोलिसांनी याप्रकरणी तिघांना बेडया ठोकत अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

नेमकं काय झालं ?

पती-पत्नीचं नातं हे प्रेमाचं तर असतंच पण त्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो विश्वास, पण बीडमधल्या या घटनेतून विश्वासाचाच चक्काचूर झाल्याचे समोर आले. बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे राहणाऱ्या प्रियंका सोनवणे हिचं किरण सोनवणेशी लग्न झालं. पण तिचं तिच्या पतीवर नव्हे तर दुसऱ्याच तरूणावर, दशरथ परदेशी याच्यावर प्रेम होतं. आपल्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा, किरण याचा काटा काढण्याचं प्रियांकाने ठरवलं आणि प्रियकराच्या मदतीने प्लानही आखला.

‘कार्यक्रम ओके’.. हत्या यशस्वी झाल्यावर केला फोन

त्यानंतर प्रियांका हिने तिचा प्रियकर दशरथ याच्या मदतीने, तिचा पती किरण सोनावणे याची गळा आवळून हत्या केली. मात्र हत्येचा आळ आपल्यावर येऊ नये आणि सुखरूप सुटका व्हावी यासाठी त्या दोघांनी पुढंचही प्लानिंग करून ठेवलं होतं किरण सोनावणे याच्या हत्येनंतर हा प्रकार केवळ अपघात दिसावा म्हणून प्रियांका आणि तिचा प्रियकर दशरत या आरोपींनी किरणचा मृतदेह दुचाकीखाली दाबून रस्त्याच्या कडेला टाकला होता. पोलिसांना हाँ मृतदेह रस्त्यावर सापडल्यावर त्यांनी तो ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि दुसरीकडे या घटनेचातपासही सुरू केला.

मात्र शवविच्छेदन अहवालात जे सत्य समोर आलं त्याने सर्वांनाच धक्का बसला. गळा आवळल्याने किरण याचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यावर पोलिसही अवाक झाले. त्यानंतर नेकनूर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि तांत्रिक तपास करून प्रियकर दशरथ परदेशी, त्याचा मित्र धीरज येडे आणि मृत व्यक्तीची पत्नी प्रियंका सोनवणे या तिघांना पनवेलमधून अटक केली. पतीच्या जाचाला कंटाळून आणि प्रेमसंबंधातून हा कट रचल्याचे तपासात उघड झाले. एवढंच नव्हे तरहत्या यशस्वी झाल्यावर आरोपींनी एकमेकांना ‘कार्यक्रम ओके’ असा फोन कॉल देखील केला होता, असंही तपासात समोर आलं, पोलिसांनी तिघांनाही बेड्या ठोकल्या असून पुढील चौकशी सुरू आहे. नेकनूर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा अवघ्या पाच दिवसांत लावला.

Follow Us
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... 24 तासात 6 मोठे निर्णय
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... गेल्या 24 तासात दोन व्हिडीओ अन् 6 मोठे निर्णय, दिल्लीत काय घडतंय?
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान,
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात...
विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा Video पहाच
जय हरी विठ्ठल! यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा संपूर्ण Video पहाच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
Pandharpur Ashadhi Mahapuja | ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय