फसवणुकीची विचित्र केस, ‘सोनू सूद फाउंडेशनमधून बोलतोय’, मदत करायची आहे

'सोनू सूद फाउंडेशनमधून बोलतोय', मदत करायची आहे, असे सांगून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांचीच फसवणूक करण्याचे काम सायबर चोरट्याने केलेय. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झालीय. परंतु फसवणुकीचा हा नवीन प्रकार प्रथमच समोर आलाय.

फसवणुकीची विचित्र केस, 'सोनू सूद फाउंडेशनमधून बोलतोय', मदत करायची आहे
sonu sood
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 2:55 PM

बीड : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा कायमच चर्चेत राहतो. कोरोनानंतर लोकांच्या मदतीसाठी सोनू सूद हा मैदानात उतरला. मागेल त्याला या काळात सोनू सूद याने मदत केली. विशेष बाब म्हणजे कोरोनानंतर आताही सोनू सूद हा लोकांची मदत करताना कायम दिसतो. आतापर्यंत अनेकांना थेट नोकऱ्याही सोनू सूद याने दिल्या आहेत. ‘देवदूत’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सोनू सूद याच्या प्रत्येक कामाचं नेहमीच चाहत्यांकडून कौतुक झालं. आता त्याच्या या कामाचा फायदा सायबर चोरटे घेऊ लागले आहे. ‘सोनू सूद फाउंडेशनमधून बोलतोय’, मदत करायची आहे, असे सांगून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांचीच फसवणूक केलीय.

काय झाला प्रकार

बीडमधील केजमध्ये हा प्रकार घडलाय. सोनू सूद यांच्या नावार ६९ हजाराची फसवणूक करण्यात आलीय. 21 मार्च रोजी जयराम हरिभाऊ चौधरी यांचा मुलगा आणि दोन पुतण्यांचा केज तालुक्यातील सावळेश्वर पैठण येथील तलावात बुडून मृत्यू झाला होता. चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. यावेळी त्यांना नातेवाईक, मित्रमंडळींकडून आर्थिक मदत सुरु झाली. मग या पैशावर सायबर गुंडांची नगर गेली.

हे सुद्धा वाचा

चौधरी यांना फोन

30 मार्च रोजी जयराम चौधरी यांना फोन आला. फोन करणारा म्हणत होता, “मी सोनू सूद फाउंडेशनच्या कार्यालयातून बोलत आहे. मला तुम्हाला 3 लाख रुपयांची मदत करायची आहे. तुम्ही मोबाईलमध्ये Any Desk अ‍ॅप डाऊनलोड करा, असे सांगत पॅनकार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड, बँकेची माहिती घेतली.

असे काढले पैसे

फोन करणाऱ्या व्यक्तीने ओटीपी मागवून चौधरी यांच्या खात्यातून 10 हजार, 9 हजार 999, 18 हजार 321, 18 हजार 297, 5 हजार, 4 हजार 800 आणि 3 हजार 49 रुपये काढले. खात्यातून पैसे काढल्यानंतर चौधरी यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला. पण तो फोन नंबर बंद येत होता. मग फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

सतर्क राह, ओटीपी देऊ नका

देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. केसेस किती वाढत आहेत. गेल्या एका वर्षात https://cybercrime.gov.in/ वर २० लाखांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यामुळे तुम्ही तुमचा ओटीपी, आधार कार्ड, पॅन कार्डची माहिती कोणाला शेअर करु नका.

हे ही वाचा पुणे शहरात सायबर फ्रॉडची मोठी घटना, सावध व्हा, अन्यथा तुम्हालाही सायबर ठग असे करु शकतात कंगाल

Non Stop LIVE Update
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.