AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भररस्त्यात एक घटना घडली अन् काही तासातच त्याने…; परळीत हुशार तरुणाचा दुर्दैवी अंत

बीड जिल्ह्यातील परळीत तरुणीने भररस्त्यात कानशिलात मारल्याच्या अपमानामुळे चंद्रहार शिंदे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भररस्त्यात एक घटना घडली अन् काही तासातच त्याने...; परळीत हुशार तरुणाचा दुर्दैवी अंत
Chandrahar Shinde
| Updated on: May 18, 2026 | 11:59 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सर्वत्र आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. भररस्त्यात एका तरुणीने सर्वांसमोर कानशिलात लगावल्यामुळे झालेला अपमान सहन न झाल्याने एका सुशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. ही घटना परळी तालुक्यातील मोहा गावात घडली. चंद्रहार राजेभाऊ शिंदे असे आत्महत्या केलेल्या २४ वर्षीय तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रहार शिंदे हा डिझेल मेकॅनिकल डिप्लोमा झालेला अत्यंत हुशार तरुण होता. बुधवारी करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात दीपाली बबन पोटभरे नावाच्या तरुणीने त्याला सर्वांसमक्ष थोबाडीत मारली होती. या जाहीर अपमानामुळे चंद्रहार प्रचंड निराश झाला होता. त्याला जबर मानसिक धक्का बसला. हा अपमान सहन न झाल्याने गुरुवारी त्याने गावातील एका लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

चंद्रहारच्या आत्महत्येनंतर शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर चंद्रहारच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी आपला तीव्र आक्रोश व्यक्त केला. माझ्या मुलाने त्याच्या मनातील दुःख कोणालाच सांगितले नाही, ते त्याच्या पोटातच राहिले. त्याला झालेल्या अपमानामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणात सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी आरोपी अजूनही मोकाट आहेत. आरोपींना तात्काळ अटक करून आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा,” अशी मागणी त्याच्या पालकांनी केली आहे.

तर दुसरीकडे, मुख्य आरोपी दीपाली पोटभरे हिने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तिने सांगितले की, “मी त्याला कोणतीही चापट मारलेली नाही. आमचे कोणतेही वैयक्तिक भांडण नव्हते, उलट आमचे संबंध चांगले होते. मी माझ्या मुलासोबत जात असताना तो ऐकत नव्हता, म्हणून मी मुलाला घरी जाण्यासाठी एक दगड मारला होता. मात्र, चंद्रहारने माझ्यावर चुकीचा आरोप केला की मी त्याला दगड मारला. त्यामुळे माझ्यावर दाखल झालेला गुन्हा चुकीचा असून या प्रकरणात निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी दीपालीने केली आहे.

पोलीस तपास सुरू

या प्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यात दीपाली पोटभरे हिच्यासह इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी भररस्त्यात नेमका काय प्रकार घडला होता आणि तरुणाच्या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे, याचा सखोल तपास सिरसाळा पोलीस करत आहेत. मात्र, घटनेला वेळ होऊनही आरोपींना अद्याप अटक न झाल्याने नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...